Cricket Sport: अकोल्यात कलाल समाजाची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा; पिकेव्ही मैदानात ४ पासून रंगणार सामने




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सहा वर्षांपासून समाजस्तरावर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या अकोला जिल्हा कलाल समाज मंडळाच्या वतीने अकोला महानगरात चार दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब उजवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.


स्पर्धेत  राज्यभरातील महिला व पुरुषांच्या क्रिकेट चमू सहभागी होत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदान येथे ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत केएसपीएल कलाल समाज प्रीमियर लिग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. याची जय्यत तयारी मंडळाच्या वतीने पूर्ण झाली असल्याची माहिती देखील उजवणे यांनी दिली.


कृषी विद्यापीठाच्या मैदानात आयोजित या  स्पर्धांचा प्रारंभ ४ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता  मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ अकोला आदी जिल्ह्यातून पुरुषांच्या २२ आणि महिलांच्या ८ चमू सहभागी होत आहेत. यात पुणे कलाल समाज मंडळ, हिंगणघाट, कलाल यंगस्टर अमरावती, वर्धा कलाल यंगस्टर, ऑरेंज सिटी नागपूर, दबंग कलाल, मराठा कलाल अकोट, युवाशक्ती अमरावती, बुलढाणा कलाल समाज, आरसीए अकोला, युएसके अकोला, डीआरडी अकोला, केकेसी अंबाशी, केकेआर अकोला, सिटी 11 यवतमाळ, औरंगाबाद, कलाल इलेव्हन दहीगाव, संत सावजी महाराज सेना अकोला समवेत महिला चमू कॉटन सिटी क्वीन्स, महिला यवतमाळ, कलाल यंगस्टर, वुमेन अमरावती, श्री दत्त वुमन कारंजा लाड, सीके 11 महाराणी यवतमाळ, सुपर वुमन अकोला, न्यू शायनिंग स्टार अकोला ११, फ्लायर गर्ल्स क्रिकेट टीम नागपूर हे चमू सहभागी होत आहेत. 


दहा ओव्हरचा सामना असणाऱ्या या स्पर्धेत एक लाख रुपयांची जंगी बक्षिसांची लयलूट होणार आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या स्पर्धकाला वैयत्तिक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. सर्व सामने हे क्रिकेट नियमांनी होणार असून, यात एम्पायर म्हणून क्रिकेट क्लबच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. बाहेरगावच्या संघांची भोजन व निवास व्यवस्था श्रीनाना मंगलम येथे करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 


समाजात सुसंवाद निर्माण व्हावा,ग्रामीण व शहरी भागातील समाजाच्या नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून सामाजिक विकास व एकोपा व्हावा युवा पिढी समाजाच्या कार्यात यावी, यासाठी दरवर्षी हे आयोजन करण्यात येत असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला मंडळाचे सचिव नीलकंठ लोहकंपुरे, उपाध्यक्ष अनंत लोटे, युवा अध्यक्ष आकाश उजवणे, महिला समिती अध्यक्ष रेखा कट्यारमल उपस्थित होत्या.  


या उपक्रमास नानासाहेब उजवणे यवतमाळ, नितीन कोल्हटकर अमरावती, अशोकराव बिजवार यवतमाळ,गांगडे बंधू अकोला, डॉ. लोहकपुरे, विलास डगवार नागपुर, सुधीर जयस्वाल नागपूर,अंजली नाईक मुंबई, अमोल चवणे अमरावती, नानासाहेब उजवणे अकोला, संगीता लोहकपुरे, दिनेश बिजवल यांचे कडून  सहकार्य मिळत आहे. स्पर्धेची उपांत्यफेरी व अंतिम सामना हा ७ फेब्रुवारी रोजी होवून, त्यानंतर स्पर्धेचा थाटात समारोप होणार आहे. या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी सामाजिक अंतर राखून लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले. 


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महिला समितीच्या उपाध्यक्षा कल्पना बिजबल, सचिव नलिनी गुजर, युवा उपाध्यक्ष दीपांशु लोटे, सचिव ऋषिकेश बडोदे, नंदकिशोर शंकरपुरे, योगेश राऊत, अमोल चिलात्रे, दादा उजवणे, योगेश राऊत, अतुल राऊत, गणेश ददगाळ, उमेश बीजवाडे, विनोद बीजवाडे, किरण शिंदे, रवी कुरवाळे, अनिल खराटे, आकाश उजवणे, सुरेन्द्र जयस्वाल,प्रशांत बडोदे,मनीष लोटे,मनोज लोहकंपुरे, ललित उजवणे, सुनील राऊत, जंयत शिन्दे, जंयत गणोजे व अमोल सावजी समवेत मंडळ व महिला समितीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत असल्याचे उजवणे यांनी सांगितले.


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा: अकोल्यात कलाल समाजाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा


टिप्पण्या