- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
अकोला: राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात कोरोनाची लागण राजकीय नेत्यांनाही झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ४ नेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे , जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती .आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
बच्चू कडू यांनी आज स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
बच्चू कडू यांचे ट्विट
"माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वत:ची चाचणी करून घ्यावी.",असे बच्चू कडू यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांना पहिल्यांदा १९ सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते 'प्रहार जनशक्ती' पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्य मंत्री पदाची जबाबदारी आहे. तसेच अकोल्याचे पालकमंत्री पद देखील सांभाळत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा