corona update: अकोला: आज दिवसभरात ९८ पॉझिटीव्ह; १मयत

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२८४*  
*पॉझिटीव्ह-९८*
*निगेटीव्ह-१८४*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश असून ते  कौलखेड, राउतवाडी, विद्या नगर, बाळापूर, अमाणखा प्लॉट, बार्शीटाकली व अकोट येथील रहिवासी आहे. 

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तापडीया नगर, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुषांचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक,  तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २८ अशा एकूण ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१००७६ +२१४२+१७७=१२३९५*
*मयत-३४३*
*डिस्चार्ज-१११४०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-९१२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या