Corona update: ...तर सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवार यांनी दिले 'पुन्हा लॉकडाउन'चे संकेत




भारतीय अलंकार

औरंगाबाद/अकोला: कोरोना लसीकरण सुरू झालेले असताना देखील राज्यातील काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे सरकारला कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली आहे. नागरिकांना त्रास देण्याचा हेतू नाही पण नागरिकांनी यासाठी मानसिकदृष्टीने तयार राहावे, असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे. 



जानेवारीचा अखेरचा आठवडा आणि फेब्रुवारी महिन्याच्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या पुन्हा झपाट्याने वाढली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. रात्री मुंबईला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील,असे देखील पवार यांनी स्पष्ट केले.  



अकोला अमरावती जिल्ह्यात रूग्ण वाढले


राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे. 


अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने तसेच शाळा, हॉटेल, लग्न सोहळे, कार्यक्रम, मोर्चे,धरणे,निदर्शने, ग्रामपंचायत, विविध संघटनाच्या निवडणूक यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे निदर्शनास येत आहे. 


अकोला: कोरोना अहवाल

दरम्यान, अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 183 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 107 अहवाल निगेटीव्ह तर 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान 50 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12481(10152+2152+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 89000 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 87034 फेरतपासणीचे 358 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1608 नमुने होते. आजपर्यंत एकूण 88940 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 78788 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 


76 पॉझिटीव्ह


आज दिवसभरात 76  जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 32 महिला व 44 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, अकोट, पाटी, रवीनगर, कोठारी वाटीका, कपील नगर,खडकी, गायत्री नगर, राजपूत पुरा, रिध्दी सिध्दी, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा ता.मुर्तिजापूर, डोंगरगाव, मुर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.


दरम्यान काल रात्री (दि.14) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.


50 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन तर होम आयसोलेशन येथून 23 असे एकूण 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


एकाचा मृत्यू


दरम्यान आज दुपारनंतर हिवरखेड ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या 81  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


947 जणांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12481(10152+2152+177) आहे. त्यातील 344 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11190 आहे. तर सद्यस्थितीत 947 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे



अकोल्यात 28 फेब्रुवारीपर्यंत पुर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्याचे निर्देश



जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून कोविड-19 चा प्रार्दुभाव व फैलाव रोखण्याकरिता जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायता विद्यापीठे व त्यांचेशी संलग्नीत महाविद्यालय तसेच अभियांत्रीकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका  दि. 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  निर्गमित केले आहे. कोविड-19 चा परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये प्रत्यक्ष  उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आदेशाव्दारे कळविले आहे.



टिप्पण्या