corona update: अकोला: आज दिवसभरात ३२१ पॉझिटिव्ह; १मयत

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२१रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १३९७* 
*पॉझिटीव्ह-२७९*
*निगेटीव्ह-१११८*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)१६७+ आरटिपीसीआर(सायंकाळ)११२+ रॅपिड ४२=३२१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ११२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३१ महिला व ८१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील ३५, बोरगाव मंजू येथील १४, एमआयडीसी येथील आठ, कपिलवास्तू येथील सहा, सुधीर कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, वरुद व खडकी येथील प्रत्येकी चार, मलकापूर येथील तीन, मोठी उमरी, जीएमसी, दोडवाडा, कळंबेश्वर, रजपूतपुरा व पातूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कापशी रोड, देवी खदान, संत नगर, गिता नगर, देशमुख फैल, कौलखेड, न्यु तापडीया नगर, शास्त्री नगर, कॉग्रेशनगर, जज क्वार्टर, समता नगर, जूने शहर, डाबकी रोड, बाळापूर, आदर्श कॉलनी, हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील रहिवासी असलेल्या ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते,



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, होम आयसोलेशन येथून १४ असे एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२४६७+२४८०+१७७=१५१२४*
*मयत-३६२*
*डिस्चार्ज-११८४१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२९२१*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या