corona update: अकोट, मुर्तिजापूर , पातूर, मासा येथे आज सर्वाधिक रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज  शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ९५१*  
*पॉझिटीव्ह-१५४*
*निगेटीव्ह-७९७*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६० महिला व ९४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २६, मुर्तिजापूर येथील १५, पातूर येथील १३, मासा येथील नऊ, जठारपेठ येथील सात, आदर्श कॉलनी, खेतान नगर, न्यु खेतान नगर, सिंधी कॅम्प, रामदासपेठ व नवेगाव ता.पातूर येथील प्रत्येकी चार, उन्नती नगर, बसंत नगर,  बार्शीटाकळी, जूने शहर, भागवतवाडी येथील प्रत्येकी तीन, बाळापूर, भंडारज बु, संतोष नगर, कौलखेड, खडकी, श्रध्दा नगर, विझोरा ता.बार्शिटाकळी व पिंझरा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पळसो भदे, म्हैसांग, मलकापूर, केशव नगर, कृष्ण नगरी, संत नगर, लहरिया नगर, महसूल कॉलनी, बंजारा कॉलनी, गोरक्षण रोड, लहान उमरी, गणेश कॉलनी, गवलीपुरा, कारला ता.तेल्हारा, जवाहर नगर, बोरगाव मंजू, पिंपलखुटा, महागाव, दानेद बु., डाबकी रोड, शास्त्री नगर, हरीहरपेठ, कोठारी वाटीका, तापडीया नगर, जाजू नगर, रवी नगर, राधा उद्योग, अन्वी व मळसूर ता.पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा व्यक्ती खापरवाडी अकोट येथील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२८४९+२५८९+१७७=१५६१५*
*मयत-३६४*
*डिस्चार्ज-११८८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३६३*



(शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या