corona update: अकोला: आज दिवसभरात पॉझिटीव्ह १७५; मयत २

               *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सांयकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५१९* 
*पॉझिटीव्ह-१७५*
*निगेटीव्ह-३४४*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. मुर्तिजापूर येथील पाच, तर उर्वरित जांभा बु. ता.मुर्तिजापूर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पातूर व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर दोघांचा मृत्यू झाला. त्यात तिवसा ता. बार्शीटाकळी  येथील रहिवासी असलेल्या २१  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातूर येथील ५८ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १९  रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, असे एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११५९८+२३६६+१७७=१४१४१*
*मयत-३५५*
*डिस्चार्ज-११६३१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२१५५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या