corona update: Akola: ४६ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२६७*  
*पॉझिटीव्ह-४६*
*निगेटीव्ह-२२१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, मलकापूर व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन,  जवाहर नगर, शास्त्री नगर, रणपिसे नगर, डोंगरगाव व बाळापूर  येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  बाभूळगाव, खडकी, कौलखेड, गणेश नगर, आनंद नगर, खोलेश्वर, दुर्गा चौक, तेलिवेताळ ता. पातूर, जठारपेठ, विवेकानंद कॉलनी, गोरक्षण रोड, कव्हर नगर, गजानन पेठ, तापडीया नगर, न्यू भागवत प्लॉट, खेडकर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, उगवा, आदर्श कॉलनी, चांदुर, अकोट फाईल, बार्शीटाकली व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 
 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९५९०+२०७१+१७७=११८३८*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६७३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८२७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या