corona update: Akola: आज दिवसभरात २८८ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११५७* 
*पॉझिटीव्ह-२८८*
*निगेटीव्ह-८६९*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२ महिला व ४४ पुरुषांचा समावेश आहे. गोरक्षण रोड येथील ११, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, जठारपेठ, केशव नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, खडकी, सहकार नगर, मुर्तिजापूर व उमरी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित तुकाराम चौक, राम नगर, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, पिकेव्ही क्वॉटर, बाळापूर रोड, लहान उमरी, हिंगणा रोड, कुरुम, तापडीया नगर, आनंद नगर, जूने शहर, अंबिका नगर, शास्त्री नगर, देशमुख फैल, कोठारी वाटीका, गोविंद नगर, तोष्णीवाल लेआऊट, कृषी नगर, पोलीस हेडक्वॉटर, संजय नगर, अकोट फैल, न्यु भीम नगर, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून १०,  तर होम आयसोलेशन येथून ३२ असे एकूण ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११४२३+२३३५+१७७=१३९३५*
*मयत-३५३*
*डिस्चार्ज-११५८५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१९९७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या