corona update: Akola: आज दिवसभरात २६८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

                  *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १३००* 
*पॉझिटीव्ह-२२८*
*निगेटीव्ह-१०७२*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)९१+ आरटिपीसीआर(सायंकाळ)१३७+ रॅपिड ४०=२६८



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४६ महिला व ९१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील ३०, गोरक्षण रोड येथील आठ, पारस येथील सात, मांजरी व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सहा, उगवा येथील पाच, अनवी, मोठी उमरी, राम नगर, खडकी व कौलखेड येथील प्रत्येकी चार, कान्हेरी, कोलंबी, पलसो भदे, लहान उमरी, जठारपेठ व दुर्गा चौक येथील प्रत्येकी तीन, झुरळ बु., वाशीम बायपास, तापडीया नग व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित टाकळी खोजबळ, सावरा, देवडी, सागवी मोहड, श्यामाबाद, अकोला जहॉगीर, हरीहरपेठ, शिवनी, रजपूतपुरा, गोडबोले प्लॉट, आदर्श कॉलनी, देशमुख फैल, आळशी प्लॉट, सिंधी कॅम्प, खोलेश्वर,खानापूर ता.पातूर, गजानन पेठ, श्रावगी प्लॉट, कापसी रोड, ओझोन हॉस्पीटल जवळ, मलकापूर, जवाहर नगर, म्हातोडी, न्यु राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, मनकर्णा नगर, देवरामबाबा चाळ, सोमवार वेस व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात तळेगाव ता. तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या ६८  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते,



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, स्कायलार्क येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन तर हॉटेल रिजेन्सी येथील पाच जणांना असे एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२६९५+२५२०+१७७=१५३९२*
*मयत-३६३*
*डिस्चार्ज-११८८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३१४१*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या