corona update: Akola: पॉझिटीव्ह २३४ रुग्ण ; २ मयत

                *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ९८५*  
*पॉझिटीव्ह-२३४*
*निगेटीव्ह-७५१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १०४ महिला व १३० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील ४९, एमआयडीसी व मुर्तिजापूर येथील १४, डाबकी रोड येथील ११, जीएमसी येथील १०, केशव नगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेश नगर येथील प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव येथील प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजी नगर, उन्नती नगर, खोलेश्वर, गंगा नगर, खडकी व रिधोरा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित पास्टूल, कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इनकम टॅक्स, कलेक्टर ऑफीस, कपीलवास्तू नगर, कलाल चाळ, बार्शीटाकळी, पुनोती ता.बार्शीटाकळी, कारला ता. तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीता नगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेन्ट, सहकार नगर, गौरव नगर, जैन चौक, किर्ती नगर, उद्य नगर, कृषी नगर, बलोदे लेआऊट, गोडबोले प्लॉट, जूने शहर, गवलीपुरा, बाळापूर नाका, शास्त्री नगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु.,  चिचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वाशिंबा बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेल्या ५८  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माना ता.मुर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ४५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२०८२+२४३८+१७७=१४६९७*
*मयत-३५९*
*डिस्चार्ज-११६७५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२६६३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या