Boxing Sport: बॉक्सिंगचे भीष्म पितामह कॅप्टन हरिसिंह थापा यांचे निधन;अकोला बॉक्सिंग परिवाराने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला/पिथौरागढ: बाक्सिंगचे भीष्म पितामह अंतरराष्ट्रीय मुक्केबाज कॅप्टन हरी सिंह थापा यांचे निधन रविवारी झाले. ८९ वर्षीय थापा काही दिवसांपासून अस्वस्थ होते. काल रविवार दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या निवासस्थानी अंतिम श्वास घेतला. आज सोमवारी स्थानिक रामेश्वर घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे क्रीडा जगत, राजकीय, सामाजिक, व्यापारिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अकोला बॉक्सिंग परिवाराच्या वतीने आज सकाळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


भट्ट यांनी दिला आठवणींना उजाळा

वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, क्रीडा प्रबोधिनी अकोलाचे खेळाडू विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.कॅप्टन थापा यांचे शिष्य डॉ.सतिशचंद्र भट्ट यांनी या श्रद्धांजली सभेत मार्गदर्शन करून थापा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ४० ते ५० बॉक्सर उपस्थित होते. आज अकोल्यातील बॉक्सिंग हे कॅप्टन थापा यांच्या मार्गदर्शनाने,आशीर्वादाने आणि प्रेरणेने उभे आहे, अश्या शब्दात भट्ट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



कॅप्टन थापा यांचा जीवन प्रवास

संग्रहित छायाचित्र


कॅप्टन हरी सिंह थापा यांचा जन्म १४ आगस्ट १९३२ मध्ये झाला. त्यांचे पिता  जीत सिंह थापा ब्रिटिश इंडियन ट्रूप मध्ये सेवारत होते. कॅप्टन थापा यांनी प्राथमिक शिक्षा गांवातील  प्रायमरी पाठशाला सेरी कुम्डार येथून ग्रहण केली. यानंतर ते आपल्या वडिलांच्या सोबत मऊ येथे गेले. हायस्कूल मध्ये अध्ययन करीत असतानाच  १५ वर्ष वयात भारतीय थल सेनाच्या सिग्नल कोर ब्वायज कंपनीत भरती झाले.


बाळपणापासून खेळात रुची


                          संग्रहित छायाचित्र

बालपणापासूनच खेळात विशेष रुचि असणारे हरि सिंह यांनी सेना मध्ये फुटबॉलट, तैराकी, मुक्केबाजी आदि खेळात भाग घेतला. याच दरम्यान बाक्सिंग कोच एजी डिमैलो यांच्या प्रेरणाने  त्यांनी बॉक्सिंगला आपला मुख्य खेळ बनविले. कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीयस्तर वर १९५० से १९५७ पर्यंत बॉक्सिंगमध्ये मिडिल वेट गटात सलग स्वर्ण पदक जिंकली. १९५७ ला रंगून येथे आयोजित दक्षिण पूर्व एशियन बाक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताला पहिले स्वर्ण पदक मिळवून दिले. यानंतर १९५८ मध्ये टोकियो आयोजित एशियाड खेळात रजत पदक आणि याचवर्षी  लंडन कामनवेल्थ गेम मध्ये सहभाग घेतला होता.



त्यांनी वर्ष १९६१ ते १९६५ पर्यंत सर्विसेसचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सेना मध्ये विशेष सेवा दिली. वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध मध्ये अद्भुत शौर्य प्रदर्शन केले. सेना कडू त्यांना रक्षा पदक, संग्राम पदक, सेना मेडल, इंडियन इंडिपेंडेंट पदक व नाइन इयर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.वर्ष १९७५ मध्ये ते आनरेरी कैप्टन पद वरून सेवानिवृत्त झाले.




वर्ष २०१३ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार

सेवानिवृत्तिनंतर कॅप्टन थापा यांनी आपल्या घरी जनपद देवसिंह मैदान येथे मुलांना  निःशुल्क बॉक्सिंग कोचिंग देण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुशल प्रशिक्षण आणि मार्गदर्शनात सीमांत जिल्ह्यातून कित्येक प्रतिभावान राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर मुक्केबाज तयार होवून समोर आले.  बाक्सिंगमध्ये ख्याति प्राप्त करणारे कॅप्टन थापा यांना वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंड सरकार द्वारा राज्याचा पहिला द्रोणाचार्य पुरस्कार देवून सम्मानित करण्यात आले.




सीमांत जनपद मध्ये शोककळा


कॅप्टन हरी सिंह थापा यांच्या निधनामुळे सीमांत जनपद येथे शोककळा पसरली. रविवार त्यांच्या निधनाची वार्ता मिळताच देशभरातील विभिन्न संघटनेचे पदाधिकारी खेळाडू, तसेच राजकीय नेत्यांनी त्यांचे पुत्र शिक्षक चंद्र सिंह थापा व कुटुंबियांचे  प्रत्यक्ष भेटून तर काहींनी शोक संदेश पाठवून सांत्वन केले. 

टिप्पण्या