Akola Crime: जुने शहरातील एकाला बसस्थानक जवळ पिस्तुल सह पोलिसांनी केली अटक




भारतीय अलंकार24

अकोला : गुप्त माहितीच्या आधारावर बस स्थानक जवळ एका इसमाला पिस्तुल व एक राऊंड गोळीसह अटक करण्यात आली. जुने शहरातील रहिवासी असलेल्या या आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही पिस्तुल खरेदी-विक्री करिता आणली की, कोणत्या षड्यंत्राला अंजाम देण्यासाठी वापर करण्यात येणार होता, याबाबतचा तपास आता पोलीस करीत आहेत.



दरम्यान, शहर उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे हद्दीतील बस स्थानक जवळ एक आरोपी पिस्तुल (बंदूक) सह येणार आहे.



पिस्तुल जप्त


या माहितीच्या आधारावर पथकाने छापा मारला. या कारवाईत जुने शहर निवासी शाकिर खान अहमद खान याला अटक करण्यात आली. आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या जवळून विदेशी बनावटचे देशी पिस्टल, एक राउंड गोळी (मूल्य २० हजार) जप्त करण्यात आली.




ही कारवाई एसडीपीओ सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक तुषार नेवारे, जितेंद्र हरणे, महेंद्र बहादुरकर, नदीम शेख, राज चंदेल, रवि घिवे, विनय जाधव , संजय टाले, निखिल माळी यांनी केली.




टिप्पण्या