Sport news: बॉक्सर अनंता, पुनमची आंतरराष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षणासाठी निवड



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: क्रीडा प्रबोधिनीचे स्टार बॉक्सर अनंता चोपडे आणि पुनम कैथवास यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षणासाठी 'टीम इंडिया' सराव शिबीराकरिता निवड झाली  आहे. या शिबिरासाठी महाराष्ट्रातून निवड झालेले अनंता आणि पुनम महाराष्ट्रातील दोघेच खेळाडू आहेत. आगामी ऑलिम्पीक स्पर्धा तसेच वर्ल्ड चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी हे शिबीर महत्वपूर्ण मानल्या जात आहे.


अनंता चोपडे याची पंजाबातील पटियाला येथे होणार्‍या संभाव्य भारतीय बॉक्सींग संघाच्या आंतरराष्ट्रीय सराव शिबीरासाठी निवड झाली तर पुनम हिची भारतीय महिला बॉक्सींग संघ अंतर्गत दिल्ली येथे होणार्‍या सराव शिबीरासाठी निवड झाली आहे. 


तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राला वरिष्ट गटात सुवर्ण पदक मिळवून देणारा अनंता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिला बॉक्सर ठरला आहे. अनंताने टोकियो ऑलिम्पीक टेस्ट इफेक्टमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवांकित अनंताला भारतीय रेल्वे खात्यात स्पोर्ट कोट्यात नोकरी मिळाली आहे.


महाराष्ट्राच्या सिनीअर अर्थात वरिष्ट राष्ट्रीय महिला बॉक्सींग स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती तसेच 'खेला इंडिया' अंतर्गत पदक विजेता पुनम कैथवास आंतरराष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षणासाठी निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला बॉक्सर ठरली आहे. 


आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झालेले अनंता आणि पुनम कैथवास हे दोघेही खेळाडू अकोला क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू असून वसंत देसाई स्टेडियम स्थित जिल्हा बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रात राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात बॉक्सींगचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेत भारतीय बॉक्सींग संघापर्यंत पोहोचले आहेत, हे येथे उल्लेखनीय.

टिप्पण्या