Road accident: जमकेश्वर नजीक दुचाकीच्या अपघातात एक गंभीर जखमी

                                प्रातिनिधिक चित्र



भारतीय अलंकार

अकोला: जमकेश्वर नजिक दुचाकीच्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी१६ कि.मी.अंतर अवघ्या ३० मिनिटात घटनास्थळी पोहचून जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमीचे नाव राम तेजुसींग राठोड असून, वय अंदाजे ३५ वर्ष आहे. भडशिवणी ता (ता.कारंजा जिल्हा वाशिम) येथील रहिवासी आहे.




घटनाक्रम

जमकेश्वर ते धाकली रोडवर अपघात झाल्याची माहिती धाकली येथील नितीन गवई यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. लगेचच जिवरक्षक दीपक सदाफळे व सहकारी गोविंदा ढोके आणि पथकाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. तेव्हा जखमी हा गंभीर स्वरूपात बेशुद्ध अवस्थेत रोडवर पडलेला होता. 



यावेळी जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी जखमीवर घटनास्थळीच प्रथमोपचार केले असता, जखमी हा कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने यावेळी दीपक सदाफळे यांनी तोंडातील साचलेले रक्त, माती बाहेर काढुन स्वच्छ केले. कानातील व चेह-यावरील घाण साफ केली. तरीही रक्तस्राव चालुच होता. यामुळे जखमीला  क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 



यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुळकर्णी यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी नितीन गवई, महेंद्र गाढवे, असीम खान यांनी सहकार्य केले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली. 



टिप्पण्या