Road accident: नेहरू पार्क चौकात दुचाकी स्वाराला ट्रकने चिरडले;उमरीतील ६५ वर्षीय पुरुष जागीच ठार



भारतीय अलंकार

अकोला : भरधाव वेगाने येणा-या ट्रकच्या  धडकेमुळे झालेल्या अपघातात ६५ वर्षीय दुचाकीस्वार ट्रकच्या मागच्या चाकात अडकून घटनास्थळीच मरण पावले. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नेहरू पार्क चौकात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. 



अपघात होताच जवळच कर्तव्यावर असलेल्या वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून,ट्रक चालकास ताब्यात घेतले. शहर वाहतूक पोलिसांनी अपघाताची कंट्रोलरूमला माहिती दिली. 



शिवणी खदान कडून अकोला शहरात येत असलेल्या  MH-30AB - 4000 क्रमांकाच्या ट्रकने विरूध्द दिशेने येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार गाडीवरून रस्त्यावर आदळले. आणि ट्रकच्या मागच्या चाकात येवून फरफटल्या गेले. यातच दुचाकी स्वार गतप्राण झाले. रस्त्यावर रक्ताचा पाट वाहू लागला. यानंतर मृतदेह तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठवला गेला. या दुर्दैवी भीषण अपघातातील मृतक मोठी उमरी येथील निवासी ६५ वर्षी पुरण सखाराम बागडे असल्याचे कळते.पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.


टिप्पण्या