Padma Awards: भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली; सिंधूताई सपकाळ, नामदेव कांबळे यांच्यासह राज्यातील सहा जणांना पुरस्कार

देशातील ७ खेळाडूंना पुरस्कार जाहीर

The Government of India announced the Padma Awards



भारतीय अलंकार24

नवी दिल्ली: २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये भारताच्या तब्बल सात खेळाडूंना पद्म पुरस्कार जाहीर झाला  आहे. गृह मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या यादीत या सात खेळाडूंची नावे असल्याचे समोर येत आहे.तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अत्युच्य कामगिरी करणाऱ्या सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे.


पद्म पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये मौमा दास, पी अनिता, अंशू जम्सेनपा, माधवन नामिबियार, सुधा हरी नारायण सिंग, वीरेंदर सिंग आणि केवाय व्यंकटेश सिंग यांचा समावेश आहे. या सगळ्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एकूण १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून यात सात खेळाडूंचा समावेश आहे.


पद्मश्री पुरस्कार हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

दरम्यान, कोरोनामुळे यंदाचे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी सुने सुने गेले. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तब्बल सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने भारतीय क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.



भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन


भारत सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहाजणांचा समावेश असून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण या मान्यवरांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारत सरकारने राज्यातील रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे आणि जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. सिंधूताई सपकाळ यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा सन्मान सरकारने केला आहे. नामदेव कांबळे यांचे साहित्यातील योगदान भारत सरकारकडून गौरविण्यात आहे. परशुराम गंगावणे यांच्या कला टिकविण्यासाठीच्या आगळ्या कामाचाही गौरव सरकारने केलेला आहे. 




टिप्पण्या