- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
नवी दिल्ली: प्रख्यात भजन गायक नरेंद्र चंचल यांचे आज दिल्लीत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार ते मागील तीन महिन्यांपासून आजारी होते. उपचार दरम्यान त्यांनी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर त्यांचे चाहते या दुःखद बातमीबद्दल शोक व्यक्त करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नरेंद्र चंचल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अवतार चित्रपटातील अजरामर गाणं
file photo
नरेंद्र चंचल यांचा जन्म अमृतसरमध्ये झाला होता. ऋषी कपूरच्या बॉबी चित्रपटद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर 'अनम', 'रोटी कपडा और मकान' आणि 'अवतार' यासारख्या चित्रपटांमध्ये गायिलेली त्यांची गाणी प्रसिद्ध झाली आहेत. मात्र,अवतार चित्रपटात गायलेले गाणे 'तुने मुझे बुलाया शेरावालीये' त्यांच्या गायकीने अजरामर झाले आहे. चित्रपट सुपर डूपर हिट होण्यात या गाण्याचा आणि चंचल यांच्या गायिकीचा मोठा वाटा होता. या चित्रपटानंतर मात्र त्यांनी भजन गायनातच उत्तम नाव कमावले.
नरेंद्र चंचल हे विशेषतः देवीच्या भक्ती गीतांसाठी परिचित होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाण्यांना आवाज दिला आहे. नरेंद्र चंचल यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा