Katepurna dam: काटेपुर्णा धरणात युवकाचा मृतदेह आढळला; घात की अपघात!




भारतीय अलंकार

अकोला: महान येथील काटेपुर्णा धरणाच्या  मध्यभागी गेटच्या बाजुला एका युवकाचा मृतदेह आज सकाळी तरंगताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतक हा मोरझाडी येथील नागेश पाटील असल्याचे चौकशी अंती पोलिसांना कळले. परंतू हा घात की अपघात आहे,या बाबत अद्याप स्पस्ट झाले नाही.


पिंजर पो.स्टे. ठाणेदार महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर यांनी मृतदेह बाहेर काढुन पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला जिल्हा रुग्णालयात आणला.



आज सकाळी महान येथील काटेपुर्णा धरणाच्या मध्यभागी गेटच्या बाजुला एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहीती पिंजर पो.स्टे.चे ठाणेदार महादेव पडघान यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. माहिती देऊन लगेच मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाचारण केले. तेव्हा लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयुर सळेदार, किशोर तायडे, ऋषीकेश राखोंडे हे पथकाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. तेव्हा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढुन त्याला ट्रेचर सिस्टमने बाहेर आणले.


यावेळी ठाणेदार महादेव पडघान आणि पोलीस कर्मचारी व नातेवाईक हजर होते.  मृतदेह हा नागेश मधुकर पाटील अंदाजे वय (30) रा.मोरझाडी ता.बाळापुर जिल्हा अकोला येथील असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या