Health news: भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये पाचव्या आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सातव्या स्थानावर जठराचा कर्करोग

Gastric cancer is the fifth leading cause of cancer in men and the seventh leading cause of cancer in women in India.



नीलिमा शिंगणे-जगड   

अकोला :  कर्करोगाविषयी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात जागरूकता वाढावी यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट उरो-ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉ. अश्विन ताम्हणकर आणि कन्सल्टन्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (गॅस्ट्रो-इंटेस्टीनल ऑन्कोलॉजी आणि एचपीबी ऑन्कोलॉजी) डॉ. राजेश शिंदे यांनी अकोल्यातील  ऑर्चिड हॉस्पिटल मध्ये रुग्णांना सल्ला देत असताना कॅन्सर उपचारांमधील आधुनिक सुधारणा आणि गॅस्ट्रो व उरो कॅन्सर उपचारांमध्ये रोबोटिक सर्जरीची भूमिका याविषयी माहिती दिली.



मूत्रसंस्थेच्या कर्करोगांवरील उपचारांमधील विकासावर प्रतिक्रिया देताना कन्सल्टन्ट उरो-ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉ. अश्विन ताम्हणकर यांनी सांगितले, "मूत्रमार्गाच्या (युरॉलॉजिक) कर्करोगांमध्ये मूत्रपिंडातील जखमा, किडनी, मूत्राशय, पुरुषांचे जननेंद्रीय, अंडकोष आणि मूत्रमार्गाच्या कर्करोगाचा समावेश होतो.  कोविड-१९ मुळे लोकांना आणखी धोका निर्माण झाला आहे, रुग्णांना हॉस्पिटल्स मध्ये जायला भीती वाटू लागली आहे आणि त्यामुळे आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे.  कर्करोगांवरील अलीकडील शास्त्रक्रियां व्यतिरिक्त आम्हां ऑन्कोलॉजिस्टसना असे ठामपणे वाटते की प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजी महत्त्वाची आहे आणि कर्करोगाचे लवकरात लवकर निदान केले जाणे अतिशय गरजेचे आहे. पीएसए स्क्रीनिंग आणि इतर स्क्रीनिंग पद्धतीं सारख्या विविध रोगनिदान पद्धतींच्या मदतीने आम्ही कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करू शकू.आमच्याकडे अत्याधुनिक दा विंची रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञान आहे.  कर्करोगाच्या रुग्णांना सर्वतोपरी सर्वोत्तम उपचार देण्यासाठी व त्यासाठी नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये अतिशय प्रभावी व मोठा उरोऑन्कोलॉजी आणि रोबोटिक प्रोग्राम राबवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."


जठराच्या कर्करोगांवरील उपचारांबद्दल माहिती देताना कन्सल्टन्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (गॅस्ट्रो-इंटेस्टीनल ऑन्कोलॉजी आणि एचपीबी ऑन्कोलॉजी) डॉ. राजेश शिंदे यांनी सांगितले, "भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये पाचव्या आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सातव्या स्थानावर जठराचा कर्करोग आहे. भारतात या कर्करोगाचे, खास करून मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त असल्याने उपचारांच्या विविध पद्धतींवर भर देणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि रोबोटिक शस्त्रक्रिया यांचा समावेश होऊ शकतो.  या कर्करोगांची लक्षणे दिसू लागण्यास बराच वेळ लागू शकतो पण अगदी सुरुवातीच्या टप्प्यात यांचे निदान झाल्यास रुग्णांची त्यातून सुटका होऊ शकते.  नियमितपणे तपासणी करत राहण्याबरोबरीनेच निरोगी, संतुलित आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.  भाज्या, अख्खी धान्ये यांचा आहारात समावेश केल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो.  भाज्या व धान्यांमध्ये जीवनसत्त्वे, क्षार, फायबर आणि प्रतिजैविके असतात ज्यामुळे आपले जठर व आतडे निरोगी राहते."   



रुग्णांना विशेष सल्ल्याचा लाभ मिळावा यासाठी डॉक्टर्स दर महिन्याला अकोल्यातील रुग्णालयांना भेटी देणार आहेत.सर्वोत्तम अनुभवी डॉक्टर्स, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने परिपूर्ण पायाभूत सोयीसुविधा यांच्यासह सहज उपलब्ध होतील आणि परवडण्याजोग्या असतील अशा जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करवून देण्यात नवे, उच्च मापदंड रचण्यात अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप आघाडीवर आहे. आज भारत बरोबरीने जगभरातील ४४ देशांमधील रुग्ण अपोलो हॉस्पिटल्समध्ये येऊन जीवनाच्या नव्या आशेचा अनुभव मिळवतात. 


नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील अपोलो कॅन्सर सेन्टरमध्ये जगभरात नावाजल्या जाणाऱ्या तज्ञांची टीम उपलब्ध आहे, ऑन्कोलॉजीसंदर्भात सर्व प्रकारच्या निदान आणि उपचार पद्धतींमध्ये सर्वसमावेशक सेवांनी अपोलो कॅन्सर सेन्टर सुसज्जित आहे. सर्जिकल आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजीच्या बरोबरीनेच सर्वात आधुनिक रेडिएशन ऑन्कोलॉजी तंत्रज्ञान देखील याठिकाणी उपलब्ध आहे.  हे रुग्णालय देशाच्या पश्चिम भागात कर्करोग उपचारांचे मापदंड उंचावत राहील आणि याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या प्रत्येक अवयवासाठीच्या विशिष्ट नियमांचे आणि गुणवत्ता प्रक्रियांचे पालन केले जाईल. अपोलो कॅन्सर केयरमध्ये विविध प्रकारचे वैद्यकीय, सर्जिकल आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी उपचार उपलब्ध आहेत. याठिकाणी सर्वोत्तम उपचार नियोजन आणि कार्यान्वयनासाठी नॅशनल ट्युमर बोर्ड देखील कार्यरत असल्याचे सांगितले.



टिप्पण्या