fashion show: मुर्तिजापूरात पार पडली अनोखा फॅशन शो ची प्राथमिक फेरी; दिव्यांग मुलामुलींनी दिली ऑडिशन

A unique fashion show held in Murtijapur ... Divyang boys and girls did a ramp walk



अकोला: फॅशन शो म्हणजे फक्त मेट्रो सिटी मध्येच आयोजित होतात, असे नाही. कारण, छोट्या शहरात देखील फॅशन शो यशस्वी होतात, हे मूर्तिजापूरकरांनी  सिद्ध करून दाखविले आहे. विशेष म्हणजे या फॅशन शो ला व्यवसायिक स्वरूप न देता सामाजिक जोड आयोजक देत आहेत. या शो मध्ये फॅशनेबल मॉडल नाहीत तर दिव्यांग मुला-मुलीं आपले अंगीभूत कलाविष्कार सादर करतील, हे येथे उल्लेखनीय आहे. या फॅशन शो ची ऑडीशन मूर्तिजापूर येथे झाली,शो मूर्तिजापूर येथेच पुढच्या महिन्यात होणार आहे,अशी माहिती आयोजकांनी दिली.



दिव्यांग मुलामुलींचा रॅम्प वॉक

मिस, मिसेस आणि मिस्टर मूर्तिजापुर आयकॉन आणि किड्स फॅशन शो सीजन 2 ची प्राथमिक फेरी 24 जानेवारीला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात  डॉ. प्रियंका राठोड यांच्या देखरेखीत पार पडली. या फॅशन शोच्या प्राथमिक फेरीचे विशेष आकर्षण म्हणजे  यावर्षी दिव्यांग मुले आणि मुली यांचा उत्स्फूर्त सहभाग. आपण ही इतर मुलांमुलीसारखे खेळावे, बागडावे आणि गायन ,नृत्य, फॅन्सी ड्रेस घालावे, मॉडल सारखं रॅम्प वॉक, कॅट वॉक करावा, असं त्यांना वाटतं. पण त्यांना प्लेटफार्म मिळत नाही. जागतिक दर्जा असणारा फॅशन शो विदर्भातील मुर्तिजापूर शहरात व्हावा ,आपल्या मुलामुलींना एक व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावं,या  उद्देशातून मिस, मिसेस आणि मिस्टर मुर्तिजापूर आयकॉन अँड किड्स फॅशन शो आयोजित केल्याचे आयोजक डॉ. राठोड यांनी सांगितले. नागपूरच्या डॉ. राठोड यांनी जागतिक दर्जाच्या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला असून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे


मिस्टर आणि मिस खिताब गतविजेते रंजीत चौहान आणि दिव्या दुबे या शो चे ज्युरी असतील. शो ची अंतिम फेरी पुढच्या महिन्यात मुर्तिजापूर मध्येच होणार आहे. याप्रसंगी नूतन पिंपळे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तसेच गरिमा खंडेलवाल, धनश्री भटकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. गरजू मुला मुलींना सायकल वाटप करण्यात येईल, अशी  घोषणा यावेळी नुतन पिंपळे यांनी केली. फॅशन शो मध्ये सहभागी मुले,मुली व त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या