Farmer protest: दिल्लीतील किसान आंदोलनाला हिंसक वळण: इंटरनेट सेवा बंद; शरद पवार, प्रकाश आंबेडकर,बच्चू कडू,अमोल मिटकरी यांची यावर पहिली प्रतिक्रिया




भारतीय अलंकार24

महाराष्ट्र: दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला आज हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दिल्लीतील काही भागात इंटरनेट बंद करण्यात आली. दोन महिन्यां पासून शांततेत सुरू असलेल्या या  आंदोलनातील सहभागी शेतकरी आज आक्रमक झालेत. 



प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र, या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले.   लाल किल्ल्याच्या दिशेने काही शेतकरी गेले. या झटापटीत काही शेतकरी आणि पोलिसही जखमी झाले. तर एका शेतकऱ्याचा या दरम्यान मृत्यू झाला.


मोदी सरकार जबाबदार-शरद पवार


शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिल्लीमध्ये जे हिंसक वळण लागले त्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक करु नका, असा इशारा देखील पवारांनी दिला आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांची दखल सरकारने वेळेत घेतली असती आणि नवीन कायद्यांबाबत सरकारने योग्य भूमिका घेतली असती तर हा उद्रेक झाला नसता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


सरकारचा निषेध-प्रकाश आंबेडकर

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज अत्यंत चुकीचा आहे. लाल किल्ला सर्वांचा आहे, तो लोकशाहीचा प्रतिकही आहे, पण हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक आहे हे सांगणं ही महत्वाचं आहे. RSS-BJP सरकारचा आम्ही निषेध करतो. आंदोलन परिपक्वतेने हाताळणे शिकलं पाहिजे,अश्या प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. तर भाजप,आरएसएसच याला कारणीभूत नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बिल आणण्यासाठी नौटंकी सुरू असून काँग्रेस- राष्ट्रवादी दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचं आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त केला


दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीमाराचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निषेध केला आहे. पाकिस्तान आणि चीन समोर झुकणारे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या न्याय्य  मागण्यांसमोर झुकायला का तयार नाही?, असा सवालही यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. वेळ पडली तर परत दिल्लीला आंदोलनासाठी जाणार असल्याचं कडू म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन उभं करण्यासाठी ३० जानेवारीला  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण ठरविणार असल्याची माहिती यावेळी बच्चू कडू यांनी दिली.



ही तर हिटलरशाही-अमोल मिटकरी


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकार ही हिटलरशाही करत असल्याचं म्हणाले.






टिप्पण्या