Farmer protest: खळबळजनक: ट्रॅक्टर रॅली उधळण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या झाडणार होता; पकडलेल्या शूटरने केला खुलासा

२३ ते २६ जानेवारी दरम्यानचा रचला होता कट

       Photo courtesy:ANI:Twitter



नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांची केंद्र सरकार सोबतची अकरावी बैठकही निष्फळ ठरली. सर्वोच्च न्यायालयाने कायदे तात्पुरते निलंबित करत समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरची ही दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे. दरम्यान ही वेळ साधून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला असून शुक्रवारी रात्री घुसलेल्या एका शुटरला पकडण्यात आले आहे. या शूटरने खळबळजनक खुलासे प्रसार माध्यमांसमोर केले आहे. 


या कथित शुटरचा चेहरा झाकून त्याला प्रसार माध्यमांसमोर आणल्या गेले. सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या शुटरला पकडण्यात आले. या शूटरने अनेक खळबळजनक खुलासे केले आहे.


पकडण्यात आलेल्या या कथित शूटरने सांगितले की, २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या  ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर २३ ते २६ जानेवारी या कालावधीत शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या. तसेच त्याच्यासोबत आणखी काही जण असून, यामध्ये महिलाही आहेत. या महिलांचे काम आंदोलकांना भडकविण्याचे होते. या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे.



शूटरने सांगितले की, २६ तारखेला चार लोक स्टेजवर असणार होते. त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश होते. यासाठी या चार लोकांचे फोटो मला देण्यात आले होते. हे सारे ज्या व्यक्तीने सांगितले तो राई पोलीस ठाण्याचा एसएचओ प्रदीप आहे. तो नेहमी त्याचा चेहरा झाकून ठेवायचा आणि बोलायचा, असा गंभीर आरोप शूटरने केला  आहे. या शुटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



टिप्पण्या