Election: ग्रामपंचायत: शेगाव: प्रवीण कडाळे यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलला ऐतिहासिक यश

राजकारण: गल्ली ते दिल्ली

तरोदा - डी येथील ॲड.प्रवीण कडाळे यांच्या ग्राम विकास परिवर्तन पॅनलने ग्रामपंचायत निवडणूक मध्ये घवघवीत ऐतिहासिक यश मिळविले.



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

शेगाव : तरोडा-डी येथील ग्राम पंचायत निवडणुकीत ॲड. प्रवीण कडाळे यांच्या ग्राम विकास परिवर्तन पॅनलने घवघवीत यश प्राप्त केले आहे. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी ग्राम विकास या मुद्द्यावर येत  मी शेतकरी पॅनलच्या प्रस्थापित उमेदवारांना मोठ्या संख्येने पराभूत केले आहे. 



ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार प्रवीण कडाळे, मुक्ता कडाळे, शुभांगी जुमळे, राधा बावस्कार यांनी प्रचंड मताची आघाडी घेऊन ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. तसेच ग्राम विकास पॅनलचे आकाश सुरडकर यांचे १२ मतांनी व संदीप खंडारे यांचे केवळ १० मतांनी निसटता पराभव झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष हे ग्रा. प. तरोडा डी कडे होते. खामगांव मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी झंझावात प्रचार केला. अखेर पर्यंत पाटील यांच्या विजयाची चर्चा होती. मात्र, युवा शिक्षित पिढीने आमिषाला बळी न पडता ग्राम विकास पॅनलला घवघवीत यश संपादन करून दिले. 


ग्राम पंचायत तरोडा डी येथील ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या शपथ व जाहीरनामा नुसार गावातील रस्ते, नाल्या, घरकुल, पिण्याचे मुबलक पाणी, नवीन पिढीला व्यायाम शाळा, गावामध्ये ग्रंथालय, यासारख्या मुद्द्यावर प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल. व त्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे.  

याकरिता ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे युवा कार्यकर्ता शेखर कडाळे, परमेश्वर कडाळे, डॉ.योगेश कडाळे, सुयोग जुमळे, पप्पु कडाळे, प्रविण कडाळे, मुकेश कडाळे, आकाश सुरळकार, अनिल जुमळे, शाम कडाळे, सचिन खंडारे, भागवत मिरगे, डिगांबर बावस्कार, रमेश खंडारे, अतुल तायडे, भगवंता जुमळे, अंकुश कडाळे, गोपाल कडाळे, संदीप कडाळे, शुभम कडाळे, अरुण कडाळे, सतीश  कडाळे, प्रदीप कडाळे, प्रभाकर पांडे, सुरेश कडाळे, गजानन डाबेराव, गणेश कडाळे, बाळाभाऊ कडाळे, सुरेश बावस्कर, दिगंबर मुंडे इत्यादी ग्रामस्थ प्रतिबद्ध आहेत.

टिप्पण्या