Ambanagri express: अंबानगरी एक्सप्रेस शुक्रवारपासून धावणार; संजय धोत्रे यांच्या पाठ पुराव्याला यश!

Ambanagari Express to run from Friday;  Success to Sanjay Dhotre's follow up! (file photo)



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विदर्भातील नागरिकांच्या सोयीकरिता बहुप्रतिक्षित अंबानगरी एक्सप्रेस शुक्रवार २२ जानेवारी पासून धावणार आहे. नामदार संजय धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंबानगरी एक्सप्रेस सुरू झाली असून, वैदर्भीयांकरिता ही बाब वरदानच ठरणार आहे.


अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी व मुंबईला  सरकारी अथवा व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अंबा नगरी एक्सप्रेस सुरू करण्या संदर्भात अनेक व्यापारी संघटना व नागरिकांची मागणी होती. ही बाब लक्षात घेता  राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली.  या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता अंबानगरी एक्सप्रेस २२ जानेवारी पासून सुरु होणार आहे.  विदर्भवाद्यांची महत्त्वाची ही मागणी मंजूर होऊन सर्व नागरिकांना येण्या जाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. 


केंद्र राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी व्यापारी व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन, सरकारकडे पाठपुरावा करून अंबानगरी एक्सप्रेसची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे विदर्भातून व्यवसाय करण्यासाठी जाणाऱ्या मुंबई व परत येणाऱ्या नागरिकांना आपले कोणतेही वेळ वाया न जाता सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. नामदार धोत्रे यांच्या कार्य तत्परतेने बद्दल  विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रवासी संघटनांनी नामदार धोत्रे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे,अशी माहिती भाजप प्रवक्ता (अकोला) गिरीश जोशी यांनी दिली.

टिप्पण्या