Ambanagri express: BigBreaking: संजय धोत्रे यांच्या दणक्याने अंबानगरी एक्सप्रेस रद्द झाल्याचे आदेश मध्य रेल्वेने घेतले तात्काळ मागे

Ambanagri express: Central Railway orders cancellation of Ambanagari Express due to Sanjay Dhotre's collision (file ph oto)




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या दणक्यामुळे मध्य रेल्वेने अंबानगरी एक्स्प्रेस रद्द करण्याचे आज सकाळी काढलेला आदेश तात्काळ मागे घेवून, २५ जानेवारी पासून सुरू होण्याचा नव्याने आदेश काढला आहे.


अंबानगरी एक्सप्रेस २५ जानेवारी पासून धावणार नाही, असा संदेश आज सकाळी मध्य रेल्वेने प्रेस नोट काढून प्रसार माध्यमाना पाठविला. त्यानंतर प्रसारमाध्यमात यासंदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या, याची त्वरित दखल घेवून ना. धोत्रे यांनी पियुष गोयल व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची थेट संपर्क साधला. अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ना धोत्रे यांच्या दणक्याने ही रेल्वे पुन्हा सुरू होण्याचा आदेश काढण्यात आला. आपल्या कार्यतत्परतेचा परिचय ना. धोत्रे यांनी करून दिला. यामुळे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणारी व वेळेची बचत करणारी अंबा नगरी एक्स्प्रेस आता पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजू होत आहे. 



केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही रेल्वे पुन्हा धावणार आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री यांचे सहाय्यक अधिकारी अमित भोळे   तसेच भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर  सावरकर यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून ही रेल्वे सुरू करण्याचा आदेश रेल्वे विभागाकडून काढण्यास यश प्राप्त केले आहे. अनेक रेल्वे प्रवाश्यांनी  नामदार धोत्रे यांच्या कार्यतत्पर बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.


असा होता संदेश

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अमरावती मुंबई विशेष गाडी रद्द होत असल्याबाबत प्रसिद्धी पत्रक, संदेश आज जारी केले होते. रेल्वे प्रशासन द्वारा सुरू करण्यात येत असलेली दिनांक 25.01.2021 पासून गाडी क्रमांक 02112 अप अमरावती मुंबई विशेष गाडी आणि दिनांक 26.01.2021 पासून गाडी क्रमांक 02111 डाऊन मुंबई अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घेण्यात यावी,असे यात नमूद केले होते.



यानंतर गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रकाशित व प्रसारित झाले. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.मात्र,ही बाब लक्षात येताच ना धोत्रे यांनी दखल घेवून, रेल्वे मंत्री आणि प्रशासनाशी संपर्क साधून गाडी रद्द झाल्याचा आदेश रद्द करण्यास भाग पाडले.


हे सुध्दा वाचा: Ambanagriexpress:अंबानगरी एक्सप्रेस शुक्रवारपासून धावणार; संजय धोत्रे यांच्या पाठ पुराव्याला यश!








टिप्पण्या