flower-exhibition-akola-garden: पहिल्याच दिवशी पुष्प प्रदर्शनीला पुष्पप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला गार्डन क्लब व महाबीज द्वारा आयोजित दोन दिवसीय पुष्प प्रदर्शनीच्या पहिल्या दिवशी अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. दिनांक 20 व 21 डिसेंबर असं दोन दिवस प्रदर्शन अकोल्यातील शुभ मंगल कार्यालय येथे अकोला गार्डन क्लबच्या वतीने आयोजित केलेला आहे. दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी दीप प्रज्वलन करून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. 




प्रदर्शनाला आज दिवसभरात अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, प्रभात किड्स  संचालक डॉ. गजानन नारे, यांच्यासह इतरही मान्यवरांनी भेट दिली.

  


अकोला शहरातील पुष्पप्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध प्रकारचे गुलाब, शेवंती सह इतरही अनेक दुर्मिळ जातींच्या फुलांचा समावेश असतो. सोबतच कॅक्टस, इंडोर प्लांट्स, व विविध प्रकारच्या औषधीय गुणधर्म असणारे वृक्ष सुद्धा या प्रदर्शनीमध्ये बघायला मिळाले. काही दुर्मिळ वनस्पतींच्या जाती सुद्धा येथे प्रदर्शनीमध्ये असल्याने अकोलेकरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. 




यंदा प्रदर्शनीच हे 52 व वर्ष असून पन्नास वर्षांपूर्वी ॲड. भु. ना. मुखर्जी, वसंत बाबू खंडेलवाल(मारोती शोरुम) केदार अग्रवाल, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली होती. पन्नास वर्षाच्या प्रवासात या संस्थेने अकोलेकरांच्या मनात स्थान मिळवलं असून दरवर्षी नागरिक या प्रदर्शनीची वाट बघत असतात. 



पहिल्याच दिवशी प्रदर्शनीला हजारो नागरिकांनी भेट देऊन प्रदर्शनीच कौतुक केलं असून, गार्डन क्लबचे ज्येष्ठ सभासद यू.टी. ठाकरे, हिरुळकर व अग्रवाल यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली होती. 



नागपूर येथून आलेल्या परीक्षकांनी उत्कृष्ट फुल व  झाडांची गटनिहाय परीक्षण करून त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना श्रेणी उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात होणार आहे. 




पुष्पपदर्शनीच्या यशस्वी आयोजनामध्ये अकोला गार्डन क्लबचे माजी अध्यक्ष जयप्रकाश पाटील, अजय सेंगर  यांचे सह विद्यमान अध्यक्ष संजय शर्मा,  सुधीर राठी, सचिव श्याम गोटफोडे, सुनील कवीश्वर, विजय ढवळे,  निशिकांत बडगे, दिनेश पारेख, नीरज आवंडेकर, संजय हैडा, अनुराधा ढवळे, शारदा बियाणी, अर्चना सापधरे, कोकिळा पाटील, हिना शहा वैशाली पाटील व अमिता सायानि यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.



आयोजकांच्या वतीने अकोलेकरांना रविवार 21 डिसेंबर शेवटच्या दिवशी  प्रदर्शनी बघण्याचं आवाहन केलं जात आहे.



टिप्पण्या