- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: हिमायू रोड वरील सांगलीवाला शोरूम जवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्डयावर आज विशेष पथकाने धाड टाकून चार आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. या संबंधी शहर कोतवाली येथे पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सचिन कदम यांचे विशेष पथकाने सांगलीवाला शोरूम, जवळ हिमायु रोड येथे एक्का बादशाह राणी गुलामचा ५२ पत्ता जुगारावर धाड टाकली.
यावेळी आरोपी एजाज खान अलियार खान( बैदपुरा), माजिद खान दौलत खान (बार्शीटाकळी), अब्दुल शरीफ अब्दुल रज्जाक( अकोट फैल भारत नगर), अजय छोटकर (तारफैल ) यांचे जवळून जुगार साहित्य व नगदी रोख ११,५००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीं विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा