Agriculture Insurance: नववर्षाच्या प्रारंभीच आमदार सावरकरांचा ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीवर दणका!

Farmers should be given justice by filing a case against Agriculture Insurance Company: MLA Savarkar




भारतीय अलंकार

अकोला: खरीप हंगाम २०१९ करिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत कौलखेड जहाँगीर (ता.अकोला) येथील ऑनलाईन विमा हप्ता अदा केलेल्या शेतक-यांना देय रकमेपेक्षा कमी मिळालेल्या रकमेपोटी कृषी विमा कंपनी कडुन फरकाची सुमारे ९६ लक्ष रुपयाची विमा रक्कम वारंवार आवश्यक पाठपुरावा करुन देखील शेतक-यांना अदा करण्यात न आल्याने ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करुन शेतक-यांना न्याय द्यावा. तसेच या शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध कार्यवाही करावी तसेच कार्यवाही न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन व शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास अधिकारी वर्ग जबाबदार राहतील, असा इशारा  जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व शेतकरी  शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर व निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना तक्रार व निवेदनाद्वारे केली आहे.



विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

शासन तसेच विमा कंपनीचे सर्व संबंधितांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असुन, अद्यापपर्यंत विमा कंपनीने पात्र शेतक-यांना फरकाची देय रक्कम अदा केलेली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद विमा कंपनीकडून मिळत नसल्यामुळे संबंधित शेतक-यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच आर्थिक नुकसानीची भिती सतत भेडसावत असल्याने विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी व तक्रार आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे केली.


विमा कंपनी कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नाही


खरीप हंगाम २०१९ मधील पळसो मंडळामध्ये सोयाबिन पिकांकरिता प्रती हेक्टर २३,७०० रुपये रक्कम मंजूर असतांना शेतक-यांना मात्र रु १४,४०० दराने रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडुन जमा करण्यात आली आहे. परंतू, मंजूर २३,७०० रुपयांच्या बदल्यात प्रत्यक्षात अदा केलेले रु १४,४०० यातील फरकाची उर्वरीत रक्कम रु ९,३०० प्रती हेक्टर रक्कम कमी देण्यात आली आहे. या विमा राशीच्या फरकाची रक्कम रु ९५,६९,७००/- इतकी देय आहे. याबाबत विमा राशीच्या फरकाची देय रक्कम तातडीने कौलखेड जहाँ. येथील पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला व रिजनल मॅनेजर, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व कृषी कार्यालयामार्फत वेळोवेळी कळविले आहे. परंतु विमा कंपनी कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नाही. फरकाची रक्कम विमा कंपनीकडुन अदा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी त्यांचे पत्र एआयसी/एमआरओ/पीएमएफबीवाय-२०१९/२६५A/२० दि. २८ ऑक्टोंबर,२०२० अन्वये जिल्हाधिकारी अकोला व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला यांना कळविलेले आहे.


तांत्रिक दोषामुळे कौलखेड जहागीर गावातील २७७ शेतकरी वंचित



कार्यवाहक क्षेत्रीय व्यवस्थापक ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांचे २८ ऑक्टोंबर २०२० चे पत्रानुसार मौजे पळसो महसुल मंडळा नुकसान भरपाई लागु झाली असुन, पळसो मंडळातील मौजे कौलखेड जहागीर या गावातील पीक विमा काढलेल्या शेतक-यांची नावे कौलखेड मंडळात त्यांचे कडुन तांत्रिक दोषामुळे समाविष्ठ केल्यामुळे कौलखेड जहागीर गावातील एकुण २७७ शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यापासुन वंचित राहिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे राष्ट्रीय पीक विमा संकेत स्थळावर गावांची सेन्सस कोड नुसार अचूक म्यापिंग करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्यामुळे पीक विमा योजना खरीप-२०१९ हंगामात योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत राष्ट्रीय पीक विमा संकेत स्थळावर म्यापिंग केलेल्या अधिसूचित महसूल मंडळनुसार पात्र नुकसान भरपाई संबंधित शेतक-यांना डीबीटी व्दारे देण्यात आली आहे व उपरोक्त गावाचे तांत्रिक चुकीने म्यापींग झाल्यामुळे देय फरकाच्या नुकसान भरपाईचे दायित्व विमा कंपनीचे नसल्याबाबत कळविलेले असले तरी हीचबाब अस्तित्वात असतांना १४,४०० रु दराने विमा कंपनीने शेतक-यांना रक्कम मंजूर केली असुन अदा सुध्दा केलेली आहे त्यामुळे फरकाची रक्कम वितरीत करतांना विमा कंपनीने अधोरेखीत केलेली तांत्रिक अडचण पुढे करण्याचे काहीही कारण नाही कंपनीकडुन शेतक-यांना वेठीस धरुन त्यांचे आर्थिक नुकसान करणे व शेतक-यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे ही बाब अमानवीय असल्याचा आरोप आमदार तथा जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केला. 


विमा कंपनी विरुद्ध तक्रार दाखल

लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या सर्वच स्तरावर आ. सावरकर यांनी पाठपुरावा केला आहे. तसेच उपोषणाच्या आंदोलनाचा सुध्दा इशारा तत्कालीन परिस्थतीत देण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर शेतक-यांना उपरोक्त विमा कंपनीकडुन विमा मोबदल्याचा अंशतः लाभ देण्यात आला असला, तरी शेतक-यांची चुक नसतांना फरकाची रक्कम विमा कंपनीने हेकीखोरपणाने शेतक-यांना वितरीत न करण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसून येत असल्याने, या सर्व बाबींची चौकशी करण्यासोबतच व्यवस्थापक ॲग्रीकल्चर इन्शुरन्स विमा कंपनी, मुंबई वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच आंदोलन उभारण्या संदर्भात इशारा प्रा. खडसे तसेच कृषी आयुक्त धीरजकुमार यांना दिला आहे.



हे होते उपस्थित


आमदार रणधीर सावरकर यांचे समवेत प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, डॉ शंकरराव वाकोडे, माधव मानकर, गिरीश जोशी, मनिराम ताले, अंबादास उमाळे, गणेश तायडे, जयंत मसने, गोपाल मुळे, योगेश गावंडे, विठ्ठल वाकोडे, मनोहर मांगटे पाटील, शेषराव पाटील इंगळे, बबलू वासू, नरेंद्र वाकोडे, नागोराव वाकोडे, सह  असंख्य शेतकरी उपस्थित होते.


टिप्पण्या