Warkari sena: वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास पंढरपूरला आत्मदहन-अरुण महाराज बुरघाटे

वारकरी संप्रदायातील संत मंडळींमध्ये सरकार विषयी तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.




भारतीय अलंकार

अकोला:विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि इतर वारकरी संघटनांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वारकऱ्यांचे भजन-कीर्तनासह २ डिसेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात झालेली असून, युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शेटे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. इतर वारकरी मंडळी ही साखळी पद्धतीने अमरण उपोषण करीत आहेत. आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसाला शासनाच्या व प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी आमरण उपोषण मंडपाला भेट न दिल्यामुळे वारकरी संप्रदायातील संत मंडळींमध्ये सरकार विषयी तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. सरकारने जर शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला त्वरित परवानगी दिली नाही, तर ह भ प अरुण महाराज बुरघाटे  विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष महा क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या महाद्वारात आत्मदहन करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे. 


आमरण उपोषणामध्ये किंवा आत्मदहन यामध्ये महाराजांची जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदार सरकार राहील, म्हणून सरकारने वारकर्‍यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित मागणी पूर्ण करून वारकरी संप्रदायाला एक प्रकारे सहकार्य करावे,असे आंदोलकांनी म्हंटले आहे.


आजची कीर्तन सेवा

आज गुरुवारी उपोषणाला  किर्तन सेवा ज्ञानेश्वर महाराज सोळंके, श्रीधर महाराज पातोंड, रामकृष्ण महाराज आंबुस्कर, राम महाराज गवारे यांनी दिली. उपोषण कर्त्यांना भेट देण्याकरिता माजी आमदार हरिदास भदे , माजी आमदार बळीराम शिरस्कर,कपिल ढोके, सुधीर ढोणे, जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, राजेंद्र पातोडे  ,सिद्धार्थ शिरसाट, धीरज  शिरसाट ,गोपाल  कोल्हे, बालमुकुंद  भिरड, गणेश वानखडे आदींनी भेट दिली.  उपोषण हे वास्तव मागणीकरिता असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. 


उपोषणाला उपस्थित


 महाराज मंडळी विठ्ठल महाराज साबळे ,महादेव महाराज निमकंडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, गोदावरीताई बंड ,शिवहरी महाराज ईस्तापे, गजानन महाराज दहिकर ,रामकृष्ण महाराज आंबुस्कर, दिनेश महाराज भामोद्रे,  ह भ प रमेश मामा खिरकर ,सोपेश महाराज पाटोडे,मनोज महाराज टाले,  ,श्याम महाराज साबळे ,शिवा महाराज बावस्कर ,प्रविण महाराज कुलट ,राम महाराज गवारे,श्रीधर महाराज तळोकार, सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे, गजानन मोडक ,केशव महाराज धोटे, गोपाल महाराज रेवस्कर ,राजूभाऊ खुडे ,श्याम महाराज धनोकार, विजय महाराज राऊत ,गोपाल महाराज रेवस्कार,श्रीधर महाराज तळोकार, विलास महाराज कराड ,अमोल महाराज कुलट, वैभव महाराज अस्वार, ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, कृष्ण महाराज वाघुळ, दिनेश महाराज भामोद्रे, योगेश महाराज तांबडे ,तुषार महाराज पाटील, संभाजी महाराज तनपुरे , शिवाजी महाराज अमृतकर, श्रीधर महाराज पातोंड, गणेश महाराज जायभाये, ज्ञानेश्वर महाराज सोळंके, नारायण महाराज काळे,ज्ञानेश्वर महाराज जावरकर ,गीरी महाराज यांची अमर उपोषणाला उपस्थिती लाभली



उद्या ह भ प महिला करणार कीर्तन  


२ तारखेपासून सुरू झालेल्या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी उद्या महिला कीर्तनकार सेवा देणार आहे, अशी माहिती विश्व वारकरी सेनेच्या वतीने दिली  आहे.


VBA च्या पदाधिकाऱ्यांची भेट.



या उपोषणाला आज वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई, गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, विकास सदांशीव, शैलेश धांडे, अजय पातोडे, सिद्धार्थ शिरसाट, पुरुषोत्तम अहिर, मनोहर बनसोड,धीरज सिरसाट यांनी भेट दिली.


टिप्पण्या