Railway accident : अन मरणानंतरही मुलाने सोडला नाही आईचा हात…

                                       file photo



भारतीय अलंकार

अकोला: रेल्वे रुळ  पार करीत  असलेली एक महिला व  तिच्या सात वर्षीय मुलाचा रेल्वे खाली येऊन चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी घडली. 



श्रद्धा सिरसाट असे मृतक महिलेचे नाव आहे. ती अकोला येथील रमाबाई आंबेडकर नगर भागातील रहिवासी असून, सध्या माहेरी मुलांसमवेत राहत होती. 



या घटनेत महिलेच्या दोन मुली सुदैवाने वाचल्या आहेत. श्रद्धा सिरसाट या आपल्या दोन मुली व एक मुलासह बाळापूर तालुक्यातील जोगलखेड येथील नातेवाईकाकडे गेल्या होत्या. तिकडून परत येत असताना रेल्वेमार्ग ओलांडून त्या पारस स्थानकावर आल्या. यावेळी त्यांनी आपल्या दोन मुलींना रेल्वे मार्ग ओलांडण्यास मदत केली. त्यानंतर मुलाला घेऊन रेल्वे मार्ग पार करत असताना धडधडत आलेल्या रेल्वेगाडीने दोघा मायलेकांना चिरडले. घटना घडली त्यावेळी उपस्थित नागरिकांनी श्रध्दा सिरसाट यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मुलाला देखील वाचविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, मुलाने आपल्या आईचा हात घट्ट धरला होता. दुर्दैवाने दोघेही मायलेक क्षणार्धात चिरडल्या गेले.हे दृश्य पाहून सर्वांचे काळीज थक्क झाले. तर रुळावर आई आणि मुलाचा पंजा एकमेकांना घट्ट पकडलेल्या अवस्थेत पडलेला पाहून अनेक बघेकरांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.



टिप्पण्या