MDH Gulati: लोकप्रिय मसाले व्यापारी दादाजी गुलाटी काळाच्या पडद्याआड

धर्मपाल यांचे सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे.

                                      File photo




भारतीय अलंकार

नवी दिल्ली: मसाला कंपनी महाशय दी हट्टी (एमडीएच) चे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज पहाटे साडे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर माता चंदादेवी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनातून ठणठणीत झाल्यानंतर मात्र आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.




महाशय धर्मपाल गुलाटी यांना दादाजी म्हणतात आणि महाशयजी भारतीय मसाला व्यापारी होते. ते एमडीएच या भारतीय मसाल्याच्या कंपनीचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मसाला व्यापार आणि उद्योगात देशाची ओळख जगभर पोहचविणारे गुलाटी अबाल-वृध्दां मध्ये लोकप्रिय होते.नवनवीन शिकण्याची उमेदी मुळे ते या वयात देखील आपल्या उद्योगात सक्रिय होते. घराघरात ते आपल्या mdh च्या जाहिरातीतून पोहचले होते.



मागीलवर्षी धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले होते. 




धर्मपाल यांचे सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी अनेक शाळा आणि रुग्णालये सुरू केली. कोरोना  काळात त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ७५०० पीपीई किट देखील उपलब्ध केले होते.





महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथे २७ मार्च १९२३ ला झाला होता. ते केवळ पाचवी पर्यंत शिकले होते. त्यांचे अभ्यासात कधीही मन लागले नाही. त्यांचे वडील चु्न्नीलाल यांना वाटे की त्यांनी खूप शिकावे. फाळणीनंतर ते भारतात आले होते.



                                     File photo




टिप्पण्या