leopards: शेत शिवारात दोन बिबट मृतावस्थेत ; परिसरात खळबळ!

Male and female leopards were found dead in Pimpalkhuta farm area; excitement in the area!



भारतीय अलंकार

अकोला: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा शेत शिवारात दोन बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पिंपळखुटा येथील शेतकरी नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतात असलेल्या विद्युत खांब जवळ अंदाजे ३ वर्ष वय असलेली बिबटच्या दोन पिल्लांसह एक मुंगूस मृत अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आले. बिबट्यांचा मृत्यु अपघात की घातपात आहे,अशी परिसरात चर्चा आहे.



पातूर वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वन्यप्राणी प्रेमी व गावकऱ्यांकडून होत आहे. ही वार्ता कळताच गावकऱ्यांची एकच गर्दी झाली.



आलेगांव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांना या घटनेची माहिती कळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून घटना स्थळाचा पंचनामा करून मृत दोन्ही बिबट ताब्यात घेतले. प्राथमिक अंदाजा नुसार विद्युत प्रवाहाने बिबटची मृत झाला असावा. शवविच्छेदना नंतर येणाऱ्या अहवालात नेमके कारण कळेल, असे नालिंदे यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले.



बिबट व मुंगूसाचा मृत्यू वन्यजीव विभागाच्या दुर्लक्षामु़ळे झाला असून, वन्यजीवांना जोपासण्याची जबाबदारी असल्याने वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे वन्यजीवांना मुकावे लागत असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमीं कडून केला गेला.







टिप्पण्या