- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रीडांगण: अधि. नीलिमा शिंगणे-जगड
रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने ५३ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने एका गडीच्या मोबदल्यात ९ धावा केल्या आहेत.
नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (०) आणि सलामी फलंदाज मयांक अगरवाल (५) नाबाद आहेत. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ लागोपाठ दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाकडे ६२ धावांची आघाडी आहे. आजच्या एका दिवसात एकूण १५ विकेट पडल्या. यामध्ये भारताच्या पाच आणि ऑस्ट्रेलियाच्या दहा विकेट आहेत.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे सामना रंगतदार झाला आहे. सामन्याचे अजून तीन दिवस आहेत. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानतर अवघ्या ११ धावांत भारताचे खेळाडू बाद झाले. विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर २४४ धावांचे आवाहन ठेवले होते.
भारतीय संघाने दिलेल्या आवाहनाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना बुमराहने पायचीत करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मार्नस लाबुशेनने एका बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ १९१ धावांवर आटोपला. कर्णधार टीम पेन याचे अर्धशतक आणि मार्नस लाबुशेन याची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाची बाजू सावरल्या गेली. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले.
Brief Scores: India 244 all out & 9/1 (Mayank Agarwal 5*; Pat Cummins 1/6) lead Australia 191 all out (Tim Paine 73*, Marnus Labuschagne 47; R Ashwin 4/55) by 62 runs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा