Election2020: अमरावती विभाग: शिक्षक मतदार संघाच्या मत मोजणीला प्रारंभ; कोण जिंकणार कोण हरणार उत्सुकता शिगेला

Election2020: Amravati Division: Counting of votes for teachers begins;  Curiosity about who will win and who will lose



अमरावती विभागात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले.




भारतीय अलंकार

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज ३ डिसेंबर रोजी होत आहे. अमरावती येथील विलास नगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी होत आहे. यासाठी यंत्रणा पहाटे पासूनच सज्ज झाली आहे. यामध्ये कोण जिंकणार आणि कोणाला हार स्वीकारावी लागणार याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.काही तासांनी ही उत्सुकता संपून निकाल लवकरच हातात येईल.




शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले.  मतमोजणीच्या ठिकाणी १४ टेबलवर  मतमोजणी होणार आहे. यासाठी कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



मतमोजणीची सुरवात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. सुरवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. 


या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येतील. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.


मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, माध्यम कक्ष, भोजन कक्ष, सुरक्षा कक्ष आदी विविध बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.









 

टिप्पण्या