पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे पूर्ण करण्यात आली. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 86.73 आहे. मतमोजणी दोन कक्षात 14 टेबलवर घेण्यात आली. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर ठेवण्यात आले. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण झाले.
प्रथम पसंतीच्या पहिल्या फेरीचा निकाल
पहिल्या राऊंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.
या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- 666, श्रीकांत देशपांडे - 2300, अनिल काळे - १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख - ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम - ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक - ३१३१, विकास सावरकर - ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.
प्रथम पसंतीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल
पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली.
या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) : डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), श्रीकांत देशपांडे - २८२२ (५१२२), अनिल काळे - १४ (२६) , दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), अभिजित देशमुख - १४ (२३), अरविंद तट्टे- ६६ (७९), अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), आलम तनवीर- १७(२६), संजय आसोले- ७४ (१०४) , उपेंद्र पाटील- १४ (३५), प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९) , सतीश काळे- ११ (८९), निलेश गावंडे- ९३९ (२१२२), महेश डावरे- १४९ (२९०) , दिपंकर तेलगोटे- १०(१६) , डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), शेखर भोयर- २८११ (४८८९) , डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , विनोद मेश्राम - ८ (१५) , मो. शकील- १८ (३२), शरद हिंगे- २९ (५४), श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०) , किरण सरनाईक - २९५७ (६०८८), विकास सावरकर - ३११ (६२५) , सुनील पवार- २१ (५६), संगीता शिंदे- १५५३ (२८५७).
त्यानुसार दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला. या कोट्याची आकडेवारी 14916 अशी निश्चित झाली.
एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. या गणनेत सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरून दुस-या क्रमांकाची मते तपासण्यात आली. गणनेअंती कमी मते पडलेल्या उमेदवारांना बाद करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
अविश्रांत मतमोजणी
दुस-या पसंतीच्या मतांची गुरुवारी सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्रीपर्यंत अविश्रांत सुरू होती. त्यात फेरीनिहाय कमी मते मिळालेले उमेदवार बाद होत गेले. अखेरच्या फेरीपर्यंत बाद न झालेल्या उमेदवारांत किरण सरनाईक व श्रीकांत देशपांडे हे उमेदवार उरले. किरण सरनाईक यांना सर्वाधिक मते होती. तथापि, कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुस-या क्रमांका वरील उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या मतांपैकी दुस-या क्रमांकाची जी मते सरनाईक यांना होती, ती त्यांच्या कोट्यात टाकण्यात आली. त्यानुसार 3 हजार 173 मते जमा होऊन किरण सरनाईक यांना 15 हजार 606 मते मिळाली व त्यांचा कोटा पूर्ण झाला. या प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा