- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Cricket2020: कोरोना आणि क्रिकेट: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा क्रिकेट सामना जीवनाला नवीन ऊर्जा देणारा ठरला!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रीडांगण- ✍️परिमल कांबळे
INSPIRING BOUNCE BACK & MOTIVATION TO FIGHT AGAINST COVIDE-19
2cd टेस्ट मेलबोर्न 2020:ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा क्रिकेट सामना ऐतिहासिक आणि जीवनाला नवीन ऊर्जा देणारा ठरला. हा क्रिकेट सामना हरलेल्या ,थकलेल्या, नैराश्य आलेल्या तरीसुद्धा जिद्द ,चिकाटी ,आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक संकटांवर कशी मात करता येऊ शकते, विपरीत वेळी कसे विजय व्हावे, हे दाखविणारा खरा दिशादर्शक ठरला.
शून्यातून भरारी कशी घ्यावी
File photo
२०२० Australia दौऱ्यातील पहिली टेस्ट मॅच मध्ये भारताला जो लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला, अवघ्या 36 रन्सवर संपूर्ण भारतीय संघ बाद होण्याची नामुष्की आपल्यावर ओढविली होती. त्यावर पूर्णकालीन कॅप्टन व्यक्तिगत कारणांसाठी मायदेशी परतला. पराभवामुळे चारही बाजूंनी टीका होत होती. त्यामुळे संघातील खेळाडूंचे मनोधैर्य फार खचून गेले होते. आणि अशीच काहीशी परिस्थिती या २०२० वर्षात कोविड (कोरोना ) काळात आपण सर्वांनी अनुभवली. आपल्या आरोग्यावर होणारा प्रहार, नात्यांमधील आलेला दुरावा (सोशियल डिस्टन्सइन ) आर्थिक अडचणी ,बेरोजगारी, लॅाक-डाउन, इतर सर्वीकडे भयावह परिस्थिती असताना येणारा २०२१ मध्ये या गंभीर परिस्थितीचा कशा प्रकारे सामना केला पाहीजे, हे जर शिकायचे असेल तर भारताने जिंकलेली २ टेस्ट मॅच हे सर्वात्तम उदाहरण असेल. शून्यातून भरारी कशी घ्यावी हे यातून शिकायला मिळाले.
सामना सुरूवात करतानाच अत्यंत विपरीत परिस्थिती. अंशकालीन व कमी अनुभवी कर्णधार. सिनियर खेळाडूंचा अभाव. विदेशी उसळत्या खेळपट्ट्या. त्यात अति वेगवान गोलंदाज या कठीण परिस्थितीवर मात करून जो विजय भारतीय संघाने मिळवला तो खरोखरच २०२१ वर्षाचे स्वागत करताना या सोबत येणाऱ्या अडचणी, कष्ट, समस्या यांवर जिद्दीने आत्मविश्वासाने सामोरे जाऊन जीवनातील एक कठीण सामना आपणही जिंकू शकतो, अशी आशा देणारा आहे.
या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ईश्वर आपल्याला आणि आपल्या देशासमोरील आलेल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि राष्ट्र सुरक्षा संबंधित सर्व समस्यांना सामोरे जाऊन यांच्यावर विजय मिळवण्याची शक्ती देवो हीच मनापासुन प्रार्थना.
लेखन
परिमल मधुकरराव कांबळे
अध्यक्ष -अस्मिता मागासवर्गीय बहुउददेशिय विकास व संशोधन संस्था,
युवा प्रमुख -राष्ट्रीय लहुशक्ती महाराष्ट्र.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा