- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रतिकात्मक चित्र
भारतीय अलंकार
अकोला : पक्षकाराला लाखो रुपयांनी फसवणारे सीए विनय थावराणी आणि यशपाल शर्मा यांच्या विरुद्ध खदान पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी फसवणूक , अवैध सावकारी सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात दोघांनाही न्यायालयाने १६ नोव्हेंबर रोजी अंतरिम जामीन दिला होता. आज २२ डिसेंबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांचाही जामीन फेटाळून लावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नोव्हेंबर मध्ये आपल्या पक्षकाराची ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सीए विनय थावराणी आणि यशपाल शर्मा या दोघांच्या विरोधात खदान पोलिसांनी फसवणूक करणे, खोटे दस्तावेज बनविणे यासह अवैध सावकारीचे गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही आरोपीना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
आरोपींच्या जामीन अर्जावर आज २२ डिसेंबर रोजी सुनावणी झाली असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन फेटाळून लावला आहे. या प्रकरणी फिर्यादी गोपाळ हाडोळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. मोहन मोयल आणि ऍड. राजेश्वर देशपांडे यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने ऍड. आशिष फुंडकर यांनी काम पाहिले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा