Corona update: कोरोनाने परत वेग वाढविला,पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत होताहे वाढ

152 अहवाल प्राप्त; 27 पॉझिटीव्ह, 119 डिस्चार्ज





भारतीय अलंकार

अकोला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 152 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 125 अहवाल निगेटीव्ह तर 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.




त्याच प्रमाणे काल (दि.30 नोव्हेंबर) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९४५८  झाली आहे. आज दिवसभरात 119  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54476 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53046  फेरतपासणीचे 249 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1131 नमुने होते. आजपर्यंत एकूण 54297 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46754 तर पॉझिटीव्ह अहवाल ९४५८(७५४३+१७३८+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज 27 पॉझिटिव्ह


आज सकाळी प्राप्त अहवालात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  12 महिला व 15 पुरुष आहेत.  हे रुग्ण  लाखपुरि ता. मुर्तिजापूर येथील तीन, मलकापूर व माधवनगर येथील प्रत्येकी दोन तर  गोरक्षण रोड, शास्त्री नगर, जेतवन नगर, गायत्रीनगर, सांगवी खु, शिवाजी नगर, खोलेश्वर, पातुर,  खडकी, दुर्गा चौक,  राऊतवाडी,  बालाजी प्लॉट, शेलाड ता. बाळापूर,  गणेशनगर, मुखर्जी बंगला,  आकाशवाणी मागे,  आळशी  प्लॉट,  जठारपेठ व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.30 नोव्हेंबर) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या प्राप्त अहवालात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या  एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


119 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, आयकॉन हॉस्पिटल मधून दोन आणि अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून तीन व होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या 97 अशा एकूण 119 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


565 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९४५८(७५४३+१७३८+१७७) आहे. त्यातील 293 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8600 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 565 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 118 चाचण्या, सात पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 118 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात अकोट येथे 13, बाळापूर येथे एक, बार्शी टाकळी येथे 11,  मुर्तिजापूर येथे सात जणांची चाचणी झाली. त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तेल्हारा येथे 25 जणांची चाचणी झाली त्यात दोन जण पॉझिटीव्ह आले. 15 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या  त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाहीत. तर जीएमसी येथे 34 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार प्रयोगशाळेत 12 चाचण्या होऊन एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आजपर्यंत 25356 चाचण्या झाल्या त्यात 1793 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


टिप्पण्या