Akola crime: वाडेगावात दरोडा: एकाच रात्री दोन बँक, दोन ज्वेलरी, एक हार्डवेअर दुकान फोडले



भारतीय अलंकार

अकोला: वाडेगांवात एकाच रात्रीला दोन बँक, दोन ज्वेलर्स व एक हार्डवेअर दुकान फोडल्याची बाब आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये वापरलेले वाहन खामखेड फाटया जवळ आढळून आले. या ठिकाणी ज्वेलरीचे रिकामे बॉक्स, संदिग्ध वाहन व चोरी करण्याचे साहित्य सापडले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



वाडेगांव येथील तुषार भुस्कुटे यांचे पुजा ट्रेडर्स अन्ड हार्डवेअर फोडले. तसेच बुलडाणा अर्बन , दत्तात्रय नागरी पतसंस्था या दोन वाणिज्य संस्था तसेच नितेश घरे यांचे न्यु लक्ष्मी ज्वेलर्स, आत्माराम लखाडे यांचे लखाडे ज्वेलर्स फोडण्यात आले असून यामध्ये रोखसह लाखो रूपंयाच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केला.



या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, पोलीस निरीक्षक हरीश गवळी, विषेश पथकाचे विलास पाटील, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन शिंदे, ए.पी.आय. चव्हाण, एस.आय.वसाडे आपल्या ताफासह पोहचले. यावेळी दुकानदार, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सुध्दा उपस्थित झाले. तसेच श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक, मोबाईल फॉरेन्सिक युनीट आदी शोध पथक वाडेगांव येथे दाखल झालेत. दरोडेखोर दुकानांची शटर तोडत असतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





टिप्पण्या