- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपींची चौकशी व तपास केला असता, त्यांनी चोरीचा गुन्हा त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली.
भारतीय अलंकार
अकोला: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला कडुन आज जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला असून, २ आरोपींसह ४,९७,०००/ - चा मुद्देमाल जप्त केला आहे
२१ऑक्टोबर रोजी बाळापुर पो.स्टे. येथे फिर्यादी रमाबाई जानराव इंगळे (वय ५८ वर्ष राहणार मनारखेड ता. बाळापुर जि. अकोला) यांनी लेखी रिपोर्ट दिला की, अनोळखी तीन इसमांनी त्यांना चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन त्यांचे जवळील सोन्याचांदीचे दागिने जबरीने चोरुन नेला, अशा रिपोर्टवरुन पो.स्टे. बाळापुर येथे अनोळखी तीन इसमांविरुध्द कलम ४५२,३९२,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला.
पोलीस अधिक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. शैलेश सपकाळ यांना या गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेवून हा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले. पो.नि. शैलेश सपकाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकातील स पो नि, नितीन चव्हाण यांचे नेतृत्वात तपास पथक गठित केले.
तांत्रिक साधनांचा तसेच गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करुन गुन्हयातील ४ आरोपीना निष्पन्न करुन आरोपी नामे उमेश दयाराम दंदी (वय २२ वर्ष राहणार - कोळासा ता. बाळापुर जि. अकोला), राष्ट्रपति उर्फ जग्गू सुखदेव सिरसाठ (वय ४० वर्ष धंदा -मजुरी राहणार - रमाबाई आंबेडकर चौक, भिमनगर जुने शहर अकोला.) यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी व तपास केला असता, त्यांनी चोरीचा गुन्हा त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली. आरोपींकडुन गुन्हयातील चोरी गेलेल्या मालापैकी १०० ग्रॅम सोन्याची रगडी किं. ४ , ९७,०००/-रु मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हयातील आरोपीना व जप्त मुद्देमाल गुन्हयाचे पुढील तपासकामी पो.स्टे. बाळापुर यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
ही कार्यवाही ही पोलीस अधिक्षक जी श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पो नि. शैलेश सपकाळ ,स्थान गुशा अकोला, सपना चव्हाण,पोउपनि. सागर हटवार सपोउपनि. जयंत सोनटक्के,पोहवा सदाशिव सुळकर, प्रमोद डोईफोडे, नापोकॉ. अश्विन मिश्रा, पोशि. शक्ती कांबळे, किशोर सोनोने,शेख वसिम,अब्दुल माजिद,मो. रफी,एजाज अहेमद,रवि इरे,चालक पोशि. अनिल राठोड, अविनाश मावळे व पो.स्टे. सायबर येथील पोशि, गणेश सोनोने व निलेश चाटे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा