VBA: वीज बिल माफी संदर्भातील फाइल एका मंत्र्याने दाबून ठेवली-प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. पण निर्णय दुसरेच घेतात




भारतीय अलंकार

अकोला: राज्यात ५० टक्के वीज बिल माफ होवू शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी सरकारकडे दिला होता, मात्र या प्रस्तावाची फाइल राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवली आहे, असे खबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.


आज अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड आंबेडकर यांनी हे विधान केले.




वीज वापरली असेल तर त्याचे बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. पण निर्णय दुसरेच घेतात. एखादा मंत्री जर निर्णय घेत असेल तर तसे मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे,असे सुध्दा आंबेडकर म्हणाले. 




वंचित करेल वीज जोडणी


वीज बिल माफ केलं नाही, तर कुणीही वीज बिल भरू नये.ज्यांच्याकडची वीज कापली जाईल त्यांच्याकडे वीज जोडणी करून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.


पालकांनी निर्णय घ्यावा



शाळा संदर्भातील एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले की,मुलांना शाळेत पाठवावे की नाही,याच निर्णय शासनाने घेतल्यापेक्षा पालकांनीच घ्यावा.






टिप्पण्या