VBA:सरकारने बाळासाहेब आंबेडकर व हजारो वारकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे- अशोक सोनोने यांची मागणी

The government should immediately withdraw the charges against Balasaheb Ambedkar and thousands of Warkaris



अकोला: मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारने दिलेली परवानगी म्हणजे वारकरी व भक्तांच्या विजय असून, मंदिरे उघडण्यासाठी पंढरपूर येथे सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले होते. यावेळी राज्य सरकारने ऍड प्रकाश आंबेडकर, वारकरी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली असल्याने दाखल केले गुन्हे त्वरित मागे घ्यावे,अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने यांनी केली आहे.




वारकरी संघटनेला वंचितची साथ

महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली. खरं तर हा मुद्दा सर्वप्रथम राज्यातील वारकरी संप्रदायाने लावून धरला होता. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुखमाई मंदिर उघडण्यासाठी वारकरी संप्रदाय व वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यान समवेत आंदोलन सुद्धा केले, आणि कोरोना काळात राज्यातील पहिलं मंदीर भक्तासाठी खुले करून दिले. यावेळी हजारो कार्यकर्ते व वारकऱ्यांवर पंढरपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले. आता मात्र सरकारने ऍड बाळासाहेब आंबेडकर व हजारो वारकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी सोनोने यांनी केली आहे.


ट्विट




राज्य सरकारने मंदिरे उघडण्यासाठी जो निर्णय घेतला, त्या निर्णयाचे आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वागत करतो, आणि मुख्यमंत्री यांनां धन्यवाद सुद्धा देतो. मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारने दिलेली परवानगी म्हणजे वारकरी व भक्तांच्या विजय आहे. असेही अशोक सोनोने यांनी म्हंटलं आहे.

टिप्पण्या