Sportnews:'फिट इंडिया कॅम्पेन-डिसेंबर २०२०' अकोल्यात राबविणार…

शाळेच्या वेळापत्रकानुसार दररोज अर्धा तास व्यायाम व खेळांकरीता राखीव





भारतीय अलंकार

अकोला: केंद्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन २९ ऑगष्ट २०१९ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहिमची घोषणा केली होती. या योजनेमध्ये देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची फिटनेस असेसमेंट टेस्ट घेण्याचे निर्देशीत केले आहे. या अंतर्गत देशभरात 'फिट इंडिया डिसेंबर २०२० कॅम्पेन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 


अकोला जिल्ह्यात देखील हा उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.



*Fit India Thematic Campaign- Virtual fzs vs der (1" December 2020 onwards)


*Fitnees Assessment through Fit India App (date of launch of fit India app will be communicated later)



*Fit India School Week (1" to 31" December 2020) Y) Fit India Quiz (date of launch will be communicated later)


*Fit India Prabhatpheri (1 to 6 December 2020) 6) Fit India Cyclothon (7 to 31" December 2020)


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.


इयत्ता ९ वी ते १२ वि चे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरु झाले. आश्रमशाळा, वसतीगृह मार्गदर्शक सूचना देऊन सुरु करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून दैनदिन व्यायाम करुन सुदृढता अंगी आणण्याच्या प्रक्रीयेत सहकार्य होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होणार आहे. 



याकरीता सद्यस्थितीत असलेल्या शाळेच्या वेळापत्रक नुसार दररोज अर्धा तास व्यायाम व खेळांकरीता विशेष राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  


Fit India School Week, Fit India Prabhatpheri, Fit India Cyclothon या उपक्रमाचे अकोला जिल्ह्यात आयोजन करताना  डिसेंबर  महिन्याचा कालावधी लक्षात घेता, सायक्लोथॉन, प्रभात फेरी या उपक्रमात विद्यार्थी सह इतर नागरीकांना देखील समाविष्ट करून घेऊन, दैनंदिन किमान ३० मिनीटे व्यायामाचे महत्त्व पटवून देणे अपेक्षित आहे. 




उपक्रमाचे आयोजन करताना कोविड-१९ साथीच्या रोगा संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारा निर्गमित सूचनांचे तसेच शासनाच्या सूचनांचे पालन होईल, असे पाहावे. 



सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी फिट इंडिया मोहीम कार्यक्रमा अंतर्गत 'फिट इंडिया कैम्पेन डिसेंबर २०२०' आपल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात आयोजन करावे. असे आवाहन  प्रकाश मुकुद, ( शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांनी केले आहे, अशी माहिती क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी दिली.


टिप्पण्या