- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
युवा कबड्डी लीग जिल्हा चाचणीचे थाटात उदघाटन
भारतीय अलंकार
अकोला: युवा खेलकुद अभियान दिल्ली द्वारा संचालित युवा प्रो कबड्डी लीग ही महाराष्ट्रातील ग्रामीण खेळाडूसाठी एक पर्वणीच ठरणार असून, या निमित्ताने खेळाडूंना आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण झाली. या संधीचा पुरेपूर फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन कबड्डी महासंघाचे महानगर अध्यक्ष डॉ. अमोल रावणकर यांनी केले.
युवा कबड्डी लीग अकोला निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ रावणकर बोलत होते.
उदघाटक राष्ट्रीय बॉडी बिल्डरपटू तथा नगरसेवक मंगेश काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक प्रभाकर रुमाले, माजी कबड्डीपटू व जि प सदस्य हरिभाऊ भालतीलक, राष्ट्रीय पंच अंबादास मागे, बॉडी बिल्डर केदार खरे, देविदास फुरंगे, राष्ट्रीय पंच साहेबराव वानखेडे, रामेश्वर कीर्तने, मंगल ठाकूर राष्ट्रीय खेळाडू निलेश मानकर उपस्थित होते.
डॉ रावणकर पुढे म्हणाले की, कबड्डी हा महाराष्ट्राचा मर्दानी मातीतील खेळ असून, याच खेळाच्या माध्यमातून खेळाडू विकास साध्य करू शकतो. याचवर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आपण अकोला जिल्ह्यात घेवू, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मंगेश काळे यांनी खेळाडूंचा सर्वांगीण विकास हा खेळ व व्यायाम यामधुनच होत असून, या दोन्ही बाबींचा अंगीकार खेळाडूंनी विद्यार्थी दशेपासूनच करावा, असे आवाहन खेळाडूंना केले.
७० खेळाडूंचा सहभाग
या निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील ७० मुलामुलींनी सहभाग नोंदविला. उदघाटना नंतर लगेच चाचणी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे आयोजन गणेश क्रीडा मंडळ उमरी येथे केले होते. निरीक्षक म्हणून धुळे येथील युवा लीगचे संयोजक माळी, पारधी, पावरा आदींनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचलन कबड्डी महासंघाचे जिल्हा सचिव राजू दाहापुते प्रास्ताविक प्रभाकर रुमाले तर आभार स्पर्धेचे संयोजक संजय मैंद यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा