road accident :कानशिवणी येवता मार्गे अकोला खड्ड्यांचा जीवघेणा प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष



भारतीय अलंकार

कानशिवणी : कानशिवणी ते येळवन, विझोरा, कातखेडा,येवता, मलकापूर मार्गे अकोल्याला जोडणाऱ्या रस्त्याची वाताहत झाली आहे. नेमका रस्ता आहे की नाही, की फक्तच नदी किंवा शेतरस्त्यातून जातो तसे फक्त चढ खड्डेच आहेत याचा थांगपत्ता नाही. या रस्त्याने ये जा करणाऱ्यांची खूप मोठी वर्दळ असते, 




कारंजा, पिंजर, मोरगांव, बोरगाव खुर्द, कानशिवणी, टाकळी, पातूर नंदापूर, देवळी,सुकळी, दोनद,राहीत, एरंडा, गोरवा आदी दूरच्या आणि जवळच्या गांवावरून याच मार्गे येणे जाणे करतात . यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी, व्यावसाईक, विद्यार्थी, खाजगी नोकरी करणारे, व्यापारी या सर्वांचे अकोला ही मुख्य बाजारपेठ असल्याने येणे जाणे याच मार्गे असते. परंतु रस्त्याची झालेल्या दुर्दशेने अनेकांच्या जीवावर बेतत आहे. अनेक नागरिक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन तर कोणी एकारीच्या साईट पाटल्यांवरुन सरळ रस्त्याच्या खाली जाऊन पडतात असे अनेक अपघात रोजच होत असून अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला आहे,परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे अजीबातही लक्ष देत नाहीत आणि विधानसभा लोकप्रतिनिधीसुद्धा यावर काही बोलत नाहीत दरवर्षी थातूर मातूर दुरुस्ती केल्याचे दाखवले जाते, फलक लावले जातात आणि ठेकेदार आपली लाखोंची बिलं काढून मोकळी होतात परिस्थिती मात्र जैसे थे राहते. मागील विधानसभा इलेक्शनच्या वेळीसुद्धा रस्त्याच्या लोकार्पण फलक तत्कालीन व विद्यमान आमदार हरीश पिंपळे, व तत्कालीन पालक मंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते लावले गेले होते तेव्हां विद्यमान पंचायत समिती सदस्य राजेश वावकार यांनी रस्ता झालाच नाही तरीही लोकार्पण फलक कशाचे लावता? प्रश्न पालकमंत्र्यांना केला होता तेव्हां त्यांनी चांगला रस्ता बनवून देऊ असे आश्वासनही दिले होते.



अनेक दिवसांपासून सदर रस्ता प्रस्तावित असून सर्व नागरिक रस्त्यांकरिता आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करित आहेत. कानशिवणी ते मलकापूर या संपूर्ण रस्त्याचे अंतर अठरा किलोमीटर असून  सदर रस्ता हा रुंदीकरणासह पूर्ण नविन करावा अशी मागणी सर्व परिसरातील गावचे नागरिक करितआहेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


निष्पाप लोकांचा जीवघेणा त्रास थांबवावा -पं.स. सदस्य राजेश वावकार  

अनेक दिवसांपासून सदर रस्ता प्रस्तावित असून रस्त्याने असंख्य नागरिक जाणे येणे करतात त्यामुळे अनेक वाहनांची वर्दळ या रस्त्याने होते परंतु रस्त्याची दुरावस्था बघता आणि सार्वजनिक बांधकाम व जबाबदार लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सोसावा लागत आहे.करिता सदर रस्ता रुंदीकरणासह संपूर्ण नविन करण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या एका निवेदनाद्वारे पं.स. सदस्य राजेश वावकार यानी केली आहे.









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा