Politics:काँग्रेस,राष्ट्रवादीला भाडोत्री नेत्यांची गरज पडते म्हणून भिंगे आणि बनकरला पळविले-प्रकाश आंबेडकर

       राजकारण: गल्ली ते दिल्ली


उध्दव ठाकरे ,अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना वारकऱ्यांपासून काही समस्या आहे का ? की वंचित वारकऱ्यांच्या सोबत आली म्हणून मंदिर उघडण्यास वेळ लागत आहे?   




अकोला: राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाहीत. त्यांना भाडोत्री नेत्यांची गरज पडते, म्हणून डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या दोन्ही वंचितच्या उमेदवारांना त्यांनी पळविले. त्या दोघांच्या जाण्याने 'वंचित' ला काहीच फरक पडत नाही, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.


आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.


भिंगे आणि बनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली आहे   हे दोघेही राजकीय प्रलोभनाला बळी पडले आहेत. वंचित बहुजन आघाडीने राज्यात चळवळ बांधताना अनेक नेत्यांना महाराष्ट्रा समोर उभे केले. पण ते वंचितला सोडून गेले. परंतू त्यांच्या जाण्याने आघाडीला काहीच फरक पडला नाही. जी मंडळी राजकीय प्रलोभनाला बळी पडतात. त्यांची राजकीय कारकीर्द अल्प काळासाठी असते. हा कालावधी संपला की ते पण संपतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, त्यामध्येच भिंगे, बनकर यांची आता गिणती होणार आहे,असे देखील आंबेडकर म्हणाले.




मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकारांनी पुन्हा राज्य सरकारवर आज निशाणा साधला. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना वारकऱ्यांपासून काही समस्या आहे का ? हरिभक्तांनी मंदिर उघडण्याची मागणी केली म्हणून राज्यसरकरला राग आला आहे का? की वंचित वारकऱ्यांच्या सोबत आली म्हणून मंदिर उघडण्यास वेळ लागत आहे, असा सवाल आंबेडकरांनी राज्य सरकारला केला. तर सत्तेतील तिन्ही नेत्यांना आंबेडकरांनी आचार्य म्हणून संबोधिले. 



तर बिहार निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुत मिळणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टिप्पण्या