Politics: लोकलेखा उच्चाधिकार समितीच्या सदस्यपदी आमदार सावरकर यांची निवड

लोकलेखा समिती ही लोकशाही संसदीय व्यवस्थेतील एक मोठे आयुध 


अकोला: महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा नियम २०६ खाली स्थापन करण्यात आलेल्या लोकलेखा उच्चाधिकार समितीच्या सदस्यपदी अकोला पूर्वचे आमदार आणि जिल्हा भाजपचे अध्यक्ष रणधीर सावरकर यांची निवड करण्यात आली आहे.



लोक लेखा समिती ही लोकशाही संसदीय व्यवस्थेतील एक मोठे आयुध असलेली उच्चाधिकार समिती असून विधानसभेतील विरोधी पक्षाचे वरिष्ठ सदस्य अध्यक्ष म्हणून या समितीचे माध्यमातून सरकार आणि प्रशासन यांचे कामकाजावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याचे काम करतात. 


विधानसभा नियम २०६ खाली महाराष्ट्र विधीमंडळा द्वारे लोकलेखा समितीची निवड करण्यात आली आहे.


विधानसभेतील सतत सहा वेळा निवडून आलेले वरिष्ठ सदस्य आणि राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष भूषविणार असून दिग्गज नेते पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,  माजी मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री संग्राम थोपटे, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, राज्य मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी राज्य मंत्री बाळासाहेब पाटील आदी वरिष्ठ नेते मंडळी सह आमदार रणधीर सावरकर यांची या महत्वपूर्ण समितीवर निवड होणे,ही अकोलेकरांसाठी फार अभिमानाची बाब आहे.


इंजिनियरिंग आणि व्यवस्थापनाचे पारंगत शिक्षण घेतलेले आमदार सावरकर यांनी मागील सहा वर्षात एक अभ्यासू आणि जिगरीने काम करणारा विधानसभा सदस्य म्हणुन विधानसभेत नाव मिळविले असून, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिग्गज नेत्यांचे सह त्यांची लोकलेखा समिती वर निवड होणे संयुक्तिक ठरेल आहे. 

 


या समितीवर जबाबदारी दिल्या बद्दल आमदार सावरकर यांनी भाजपा विधी मंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सह सर्व वरिष्ठ सदस्य आणि विधान सभा अध्यक्ष नाना  पाटोले यांचे आभार व्यक्त केले आहे.


समिती यादी:








टिप्पण्या