Historic: सिरसोली येथील इंग्रज-मराठा युद्ध भूमीवर हुतात्म्यांना श्रद्धांजली

Historic Land: Tribute to the martyrs on the War Land at Shirsoli




भारतीय अलंकार

अकोला: तेल्हारा तालुक्यातील सिरसोली     येथे सन १८०३ मध्ये झालेल्या इंग्रज-मराठा युद्धभूमीवर अठरा पगड जातीतील सैनिक जिवाची पर्वा न करता  लढले व अतुलनीय शौर्य गाजविले. मायभुमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. ही शौर्यगाथा इंग्लंडच्या लॉर्ड वेलस्ली यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये नमुद आहे.



       

सिरसोली या गावी २३ ते २९ नोव्हेंबर १८०३ या कालावधीत मराठा व इंग्रज यांच्यात घनघोर युद्ध झाले होते. लाॕर्ड वेलस्ली (गव्हर्नर जनरल,जगप्रसिद्ध युद्धनिती तज्ञ) यांच्या उपस्थितित कॕप्टन केन हा इंग्रजी फौजेचे नेतृत्व करत होता . तर मराठा फौजेचे नेतृत्व समशेरबहाद्दर सरदार कर्ताजीराव जायले करत होते. (श्री कर्ताजीराव जायले हे श्री संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांचे वडील तथा श्री संत वासुदेव महाराज यांचे पणजोबा.) हे युद्ध ६ दिवस चालले होते. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असुनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य माघारी जाण्यास भाग पाडले  होते. या युद्धात कर्ताजीराव पाटील जायले   हुतात्मा झाले. याचे स्मरण म्हणून २९ नोव्हेंबर रोजी मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता युद्धभूमीवर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली.




ययामध्ये संघर्ष सावरकर, मनीष कराळे, अवि गावंडे,  ऋषिकेश खोटरे,  राजू  गावंडे , रामदास चौखंडे, पुरुषोत्तम मोहकार, बजरंग वनकर, संदिप कुलट, श्रीकांत गायगोल, सचिन शिंदे, संतोष  ताकोत ,संजय खोटरे, प्रशांत काइंगे, जिया शहा,किशोर देशमुख, विवेक इंगळे, मुरलीधर नहाटे, विजय बेदरकर, नंदकिशोर अढाऊ यांच्यासह अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली.



टिप्पण्या