Health: कुष्ठ व क्षयरोग रुग्णांचा शोध घरोघरी जावून घेणार; १ डिसेंबर पासून शोधमोहिम

The search for leprosy and tuberculosis patients will go door to door;  Search campaign from December 1




भारतीय अलंकार

अकोला:समाजातील क्षयरोग रुग्ण व कुष्ठरुग्णाचा शोध घेवून निदान निश्चिती करुन औषोधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. घरोघरी सर्वेक्षण करुन रुग्णांचा शोध घेवून ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश सबंधितांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.




या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नियोजन भवनात आयोजीत करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा प्रसिध्दी व  माध्यम अधिकारी प्रकाश गवळी  यांची प्रमुख उपस्थिती होती.




जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 2 लक्ष 19 हजार 686 घरांना भेटी देवून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णाचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी 993 चमू तयार करण्यात आला असून त्या 1  ते 16 डिसेंबर या कालावधीत भेट देणार आहे. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. एकूण 14 दिवसाच्या कालावधीत दररोज एका चमूमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केल्यानंतर घराच्या दरवाजावर चिन्ह करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णाची थूंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास छातीचे एक्सरे काढण्यात येणार आहे. तसेच कुष्ठरोगाचे लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक  तपासणी करण्यात येणार आहे.  यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड यांनी दिली.  तसेच पथनाटय, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.

टिप्पण्या